अलख पांडे: फिजिक्सवाला या स्टार्टअपचे संस्थापक अलख पांडे हे संपत्तीच्या बाबतीत शाहरुख खानपेक्षा श्रीमंत ठरले आहेत. पांडे यांची संपत्ती 14,510 कोटी रुपये आहे, तर शाहरुख खानची संपत्ती 12,490 कोटी रुपये आहे.
शाहरुख खानपेक्षा 'हा' शिक्षक सर्वात जास्त श्रीमंत, संपत्तीचा आकडा ऐकून येईल चक्कर
शाहरुख खानपेक्षा एका शिक्षकाची संपत्ती सर्वात जास्त असल्याचं दिसून आलं आहे. अलख पांडे असं या शिक्षकाचे नाव असून तो फिजिक्सवाला या स्टार्टअपचा संस्थापक आहे. त्याच्या क्लासला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे.
26
शाहरुख खानपेक्षा आलख पांडे सर्वात जास्त श्रीमंत
शाहरुख खानपेक्षा अलख पांडे हा सर्वात जास्त श्रीमंत ठरला आहे. हुरुन इंडियाच्या 2025 च्या श्रीमंतांच्या यादीत त्याचे नाव शाहरुख खानच्या पुढे आहे. अलख पांडे याच्या नेटवर्थमध्ये 223% वाढ नोंदली गेली आहे. त्याची संपत्ती वाढून 14,510 कोटी रुपये झाली आहे.
36
शाहरुख खानची संपत्ती किती आहे?
शाहरुख खानची संपत्ती वाढली असून आता ती १२,४९० कोटी रुपये झाली आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये सामील झाल्यानंतर अलख पांडे बातम्यात आला आहे. या शिक्षकाने आता संपत्तीत शाहरुख खानला मागे टाकले आहे.
अलख पांडेच्या फिजिक्सवाला क्लासने चांगले पैसे कमावले आहेत. त्याच्या एडटेक कंपनीने FY2025 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. या कंपनीचा एकूण तोटा 1,131 कोटी रुपयांनी घटून 243 कोटी रुपये राहिला आहे.
56
या यादीत शाहरुख खान पहिल्यांदा पोहचला
या यादीमध्ये शाहरुख खानचा पहिल्यांदा समावेश झाला आहे. त्यांची चित्रपट कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटमुळे शाहरुखची संपत्ती वाढण्यात हातभार लागला आहे. शाहरुखच्या कंपनीने आर्थिक वर्षे 2023 मध्ये 85 कोटींचा शुद्ध नफा कमावला.
66
अलख पांडे कोण आहे?
अलख पांडे हा कॉलेज ड्रॉप आउट आहे. घरातून युट्यूब चॅनेलवरून अलखने शिकवायला सुरुवात केली. आता त्याचे फिजिक्सवाला हे स्टार्टअप भारतभरात प्रसिद्ध झालं आहे. आता त्याने चांगली कमाई केली आहे.