Darjeeling Landslide : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेथील सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत.
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन १७ जणांचा मृत्यू झाला. मिरिक आणि सुकिया पोखरी भागात भूस्खलन झाले. एक मोठा पूल पाण्यात वाहून गेला. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
24
भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू
या दुर्घटनेत १७ जण मातीखाली दबून मरण पावले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. दुर्गापूजेनंतर अनेक पर्यटक दार्जिलिंगला येतात, त्यामुळे अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
34
वाहतूक पूर्णपणे ठप्प
भूस्खलनामुळे बंगाल-सिक्कीम आणि दार्जिलिंग-सिलीगुडी मार्ग खराब झाले असून वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि पूल वाहून गेल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.