
IRCTC Kashmir Tour : जर तुम्ही फिरण्याचे शौकीन असाल आणि नवीन वर्ष कश्मीरच्या निसर्गरम्य ठिकाणांमध्ये साजरा करू इच्छित असाल, तर IRCTC तुमच्यासाठी एक आकर्षक पॅकेज घेऊन आले आहे. इंडियन रेलवे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) यांनी कश्मीरसाठी खास ‘Mystical Kashmir New Year Special Tour’ची घोषणा केली आहे. हा पॅकेज पर्यटकांना श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामसारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांची अविस्मरणीय सफर घडवणार आहे.
हा संपूर्ण टूर 5 रात्री आणि 6 दिवसांचा ऑल-इन्क्लुझिव्ह पॅकेज असून, त्याची सुरुवातीची किंमत ₹35,550 प्रति व्यक्ती निश्चित करण्यात आली आहे. या यात्रेची सुरुवात हैदराबादहून होणार असून, IRCTC ने या टूरची माहिती आपल्या X (ट्विटर) हँडलवर शेअर केली आहे. या विशेष पॅकेजमधून पर्यटकांना बर्फाच्छादित पर्वतरांगांचे, तलावांचे आणि हिमालयाच्या खोऱ्यांचे मंत्रमुग्ध करणारे सौंदर्य जवळून अनुभवता येणार आहे.
IRCTC दरवर्षी अशाप्रकारचे विविध टूर पॅकेजेस उपलब्ध करून देते. या वर्षीच्या New Year Special Tour साठी प्रस्थान तारीख 29 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. IRCTC ने पर्यटकांना आमंत्रित करताना म्हटले आहे, “2026 ची सुरुवात करा IRCTC च्या Mystical Kashmir New Year Special Tour Package सोबत! 5 Nights / 6 Days मध्ये समाविष्ट – Srinagar, Gulmarg, Sonamarg आणि Pahalgam. फक्त ₹35,550 पासून बुकिंग सुरु.” यादरम्यान प्रवाशांना कश्मीरची जादुई शांतता, बर्फाचे निसर्गरम्य नजारे आणि खऱ्या अर्थाने ‘स्वर्गासमान’ प्रदेश अनुभवायला मिळणार आहे.
‘मिस्टिकल कश्मीर’ पॅकेजमध्ये काय-काय मिळणार?
इतर पॅकेजप्रमाणेच हा पॅकेज देखील प्रवाशांच्या आराम आणि सोयीसाठी खास बनवण्यात आला आहे. यात कश्मीरमधील अत्यंत लोकप्रिय आणि सुंदर लोकेशन्सची सैर समाविष्ट आहे.
हे पॅकेज कश्मीरचा अस्सल अनुभव देण्यासाठी पूर्णपणे डिझाइन केले आहे.
भाडे कसे आकारले जाईल?
या पॅकेजचे शुल्क रूम ऑक्युपन्सी नुसार निश्चित केले गेले आहे.
प्रौढांसाठी शुल्क:
सिंगल ऑक्युपन्सी: ₹47,100 प्रति व्यक्ती
डबल ऑक्युपन्सी: ₹36,960 प्रति व्यक्ती
ट्रिपल ऑक्युपन्सी: ₹35,500 प्रति व्यक्ती
बाळ/मुले:
यात्रेची संपूर्ण माहिती व दिवसनिहाय कार्यक्रम (Day-to-Day Itinerary) IRCTC ची अधिकृत वेबसाइट irctctourism.com यावर उपलब्ध आहे.