IPL 2025 MI vs DC : प्लेऑफच्या शर्यतीत आज अंतिम लढत! मुंबईला रोखण्याचं दिल्लीसमोर मोठं आव्हान, सामना कधी कुठे पाहाल?

Published : May 21, 2025, 09:58 AM IST
DC vs Mumbai Indians

सार

IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 18व्या हंगामातील 63 वा सामना आज वानखेडेवर खेळला जाणार आहे. यावेळी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटलचा सामना रंगणार आहे. 

IPL 2025:  आयपीएल 2025 च्या 18व्या हंगामातील 63 वा सामना आज मोठ्या उत्सुकतेने खेळला जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामोर भिडणार आहेत. प्लेऑफसाठी ही लढत निर्णायक ठरणार असून दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता उर्वरित एका जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

सामन्याची प्रमुख माहिती : 

  • सामना कोणता? मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • सामना कधी? बुधवार, 21 मे 2025
  • सामना कुठे? वानखेडे स्टेडियम, मुंबई
  • सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरू होईल
  • टॉस : संध्याकाळी 7:00 वाजता

सामना कुठे पाहाल? 
टीव्हीवर : स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनल्स
मोबाईलवर : जिओ सिनेमा / जिओ टीव्ही अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग

गुणतालिका स्थिती : मुंबई इंडियन्स : 12 सामने – 7 विजय, 5 पराभव – 14 गुण

दिल्ली कॅपिटल्स : 12 सामने – 6 विजय, 5 पराभव, 1 सामना रद्द – 13 गुण

इतिहास काय सांगतो? ही या मोसमातील या दोघांची दुसरी लढत आहे. 13 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर 12 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आज दिल्लीला परतफेड करण्याची आणि प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्याची सुवर्णसंधी आहे.

नेतृत्व आणि खेळाडू : मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत आहे.

दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व अक्षर पटेलकडे

अंतिम लढत – कोण बाजी मारणार?
आजचा सामना जिंकणारा संघ थेट प्लेऑफमध्ये पोहोचणार असल्याने, वानखेडेवर तुफान वातावरण पाहायला मिळणार आहे. क्रिकेट चाहत्यांचे लक्ष मुंबईचा अचूक डाव आणि दिल्लीचा प्रतिशोध यामध्ये अडकून राहणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!