
IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 18व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा प्रवास संपला असला, तरी शेवटच्या सामन्यात काही क्षणांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या 14 वर्षांच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने फक्त दमदार खेळीच केली नाही, तर आपल्या नम्रतेने संपूर्ण क्रिकेटविश्वाची मने जिंकली.
धोनीच्या पाया पडला
सामना संपल्यानंतर परंपरेनुसार दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. त्याच वेळी आयपीएलमधील सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि सर्वात अनुभवी व दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी आमनेसामने आले. वैभवने हस्तांदोलन करण्याऐवजी थेट धोनीच्या पाया पडून त्यांना आदरांजली अर्पण केली. धोनीनेही लगेच वैभवच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवत त्याला आशीर्वाद दिला. दोघांमध्ये थोडा संवादही झाला, जो कॅमेऱ्यात नोंदला गेला नाही. हा भावनिक क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वैभव सूर्यवंशीचं मन जिंकणारं वक्तव्य
सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिधू आणि हरभजन सिंग यांनी वैभवशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वैभवच्या या नम्रतेचं कौतुक करत विचारलं की तू धोनीच्या पाया का पडलास? त्यावर वैभवने नम्रपणे उत्तर दिलं, “अनेकांचं त्यांना भेटायचं स्वप्न असतं. मी त्यांच्या विरुद्ध खेळत होतो. ते सिनिअर आहेत, त्यांना आदर देणं हे माझं काम आहे.”
सामन्याचा थोडक्यात आढावा
नवीन तारा उजळतोय!
वैभव सूर्यवंशीने या मोसमात पदार्पण करूनच स्वतःची छाप सोडली आहे. खेळातील चमक आणि मैदानाबाहेरील नम्रता यामुळे तो केवळ संघाचाच नाही, तर क्रिकेट रसिकांच्याही मनात घर करत आहे.