4 जानेवारी, 2024 रोजी इंडिगोने विमान प्रवासाच्या भाड्यात कपात करण्याची घोषणा केली होती. पण आता तुम्हाला इंडिगोने प्रवास करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. जाणून घेऊया याबद्दलच अधिक....
Indigo Hikes Air Fare : देशातील सर्वाधिक मोठी विमान कंपनी इंडिगोने (IndiGo) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा झटका बसला आहे. विमान कंपनीने आपल्या काही निवडक सीट्ससाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच इंडिगोने विमान प्रवासाचे भाडे कमी केल्याची घोषणा केली होता. पण आता इंडिगोने नवा निर्णय घेतला आहे.
कंपनीने काही सीट्ससाठी भाडेवाढ केल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच तुम्हाला काही खास सीट्सवर बसण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावा लागणार आहे.
या सीट्ससाठी वाढवले शुल्क
इंडिगोने सोमवारी (8 जानेवारी) माहिती देत म्हटले की, लेगरूमसह XL सीट असलेल्या ठिकाणी बसण्यासाठी प्रवाशांना अधिक शुल्क मोजावे लागणार आहेत. इंडिगोच्या A320 किंवा A320neo फ्लाइटमध्ये 180 किंवा 186 सीट्सपैकी 18 सीट्स XLआहेत. या सीट्स म्हणजेच विंडो सीटसाठी प्रवाशांना दोन हजार रूपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.
मिडल सीटसाठी देखील अतिरिक्त शुल्क
इंडिगोने पुढील बाजूस असणाऱ्या मिडल सीट्सवर (Middle Seat) बसण्यासाठी प्रवाशांना 1 हजार 500 रूपये मोजावे लागणार आहे. याआधी मिडल सीट्ससाठी 150 ते 1 हजार 500 रूपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क घेतला जायचा. पण कंपनीने मिडल सीट्सच्या भाड्यात वाढ केली आहे.
इंडिगोकडून भाडे कपात
देशातील सर्वाधिक मोठी खासगी विमान कंपनी इंडिगोने एव्हिएशन फ्युएलच्या (Aviation Fuel) किंमती कमी झाल्याने फ्युएल चार्ज लावण्याच्या निर्णयाला 4 जानेवारीपासून मागे घेतले होते. सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असल्याने शासकीय तेल कंपन्यांनी एव्हिएशन फ्युएलच्या किंमती केल्या होत्या. याचा फायदा इंडिगोच्या प्रवाशांना होत होता. यामुळे देशाअंतर्गत ते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये इंडिगोच्या तिकीट 300 ते एक हजार रूपयांपर्यंत स्वस्त झाल्या होत्या.
आणखी वाचा :