भारत आणि श्रीलंकेतील नौदलाच्या संयुक्त ऑपरेशनच्या मदतीने 500 किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
अरबी समुद्रात भारत आणि श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या संयुक्त ऑपरेशनच्या माध्यमातून तब्बल 500 किलोचे नारकोटिक्स ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहेत. एवढ्या प्रमाणातील ड्रग्ज दोन्ही बोटीत होते. या प्रकरणात बोटीमधील व्यक्तींनाही अटक केली असून श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडून आता पुढील कारवाई केली जाणार आहे.
या संयुक्त ऑपरेशनआधी श्रीलंकेच्या नौदलाला मच्छीमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटीतून ड्रग्ज घेऊन जात असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाली होती. या संयुक्त ऑपरेशनमध्ये भारतीय नौदलानेही चालाखीने सहभागी होण्याचे ठरविले. बोटीतून ड्रग्ज घेऊन जात असल्यासंदर्भातील अपडेट्स वेळोवेळी नौदलाला मिळत होते. यानंतर अखेर दोन मच्छिमार बोटींना ताब्यात घेत त्यावरील ड्रग्ज जप्त केले. या दोन्ही बोटी 24 आणि 25 नोव्हेंबरदरम्यान अरबी समुद्रात पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
आणखी वाचा :
धावत्या ट्रेनवरून धावणारी महिला, व्हिडिओ व्हायरल
वडीलांच्या अस्थींमध्ये गांजा पिकवून धूर काढला; मुलीने पूर्ण केली शेवटची इच्छा