महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? अमित शहांसोबतच्या बैठकीत काय घडले वाचा...

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण हे अद्याप ठरलेले नाही. अशातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबतची बैठक सकारात्मक होती अशी प्रतिक्रिया दिली. याशिवाय महायुतीच्या नेत्यांची मुंबईत दुसरी बैठक होण्याची शक्यता आहे. 

Meeting for Maharashtra New CM with Amit Shah :  महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल अजून अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र 28 नोव्हेंबरला रात्री दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी तीन तासांची महत्वाची बैठक पार पडली. यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार यावर निर्णय झालेला नाही. अमित शहांसोबतच्या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थितीत होते. याशिवाय बैठकीसाठी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही आले होते.

बैठकीत काय झाले?

सूत्रांनुसार, अमित शहा यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्रपणे बातचीत केली आहे. तिघांसोबत मिळून अमित शाह यांनी मंत्रीमंडळाच्या विस्ताराबद्दलही चर्चा केली. आमदारांच्या संख्येनुसार भाजप जवळजवळ 20 खाती आपल्याकडे ठेवू इच्छित आहे. याशिवाय राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला अधिक मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे.

बैठकीनंतर मुंबईत परतले तिन्ही नेते

मंत्रीमंडळ विस्तारावेळी कोणते खाते कोणाकडे असणार याबद्दलचा निर्णय झालेला नाही. खास बैठकीनंतर मुख्यमंत्री पदासंदर्भातही अद्याप कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बुधवारी रात्री उशिरा मुंबईत परतले आहेत. याशिवाय असेही बोलले जातेय की, येत्या 2 किंवा 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

मुंबईतील बैठकीत ठरणार मुख्यमंत्री

अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, “आमची बैठक उत्तम आणि सकारात्मक झाली. ही पहिली बैठक होती. यामध्ये अमित शाह, जेपी नड्डाही उपस्थितीत होते. आता महायुतीच्या नेत्यांकडून दुसरी बैठक बोलावली जाईल. यामध्ये मुख्यमंत्री पदासाठीचे नाव ठरवले जाईल.”

आणखी वाचा : 

नवीन मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट १२ राष्ट्रवादी 9 मंत्रीपदे मिळणार

शिवसेना एकट्याने निवडणूक लढवणार, काँग्रेसची साथ सोडण्याचा घेतला निर्णय?

Share this article