Saree Controversy: अमेरिकन ब्रँडने साडीला 'मॅक्सी ड्रेस' म्हणून विकलं, भारतीय उद्योजिकेने इन्स्टाग्रामवर झापलं! (VIDEO)

vivek panmand   | CMS
Published : Aug 20, 2026, 06:21 PM IST
photo

सार

एका अमेरिकन फॅशन ब्रँडने भारतीय साडीची कॉपी करून तिला वेस्टर्न ड्रेस म्हणून विकल्याचा आरोप एका भारतीय उद्योजिकेने केला आहे. या प्रकारामुळे 'कल्चरल ॲप्रोप्रिएशन' म्हणजेच सांस्कृतिक चोरीचा वाद सुरू झाला आहे.

एका भारतीय उद्योजिकेने अमेरिकन फॅशन ब्रँडवर चांगलाच निशाणा साधला आहे. या ब्रँडने चक्क भारतीय साडीला एका वेस्टर्न ड्रेसच्या रूपात विकायला काढल्याने हा वाद पेटला आहे. अर्शिया मुरजानी, ज्या 'मेरी स्टोरी' या ब्यूटी ब्रँडच्या संस्थापक आहेत, त्यांनी अमेरिकेतील 'JW PEI' या फॅशन लेबलला एका इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे धारेवर धरलं. त्यांनी आरोप केला की, ब्रँडचा 'बोटॅनिकल एम्बेलिश्ड ड्रेप्ड ओव्हरले मॅक्सी ड्रेस' हा प्रकार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चक्क एक भारतीय साडी आहे.

या प्रोडक्टच्या नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुरजानी म्हणाल्या, "आपण इथे मस्करी करतोय का? मला या गोष्टीचा खूप त्रास होतो, कारण असं वारंवार घडतं. ही फक्त प्रेरणा नाही, तर ही सरळ सरळ भारतातून उचललेली साडीची कॉपी-पेस्ट आहे आणि तिला एका नवीन 'कूल' स्टाईलच्या नावाखाली विकलं जातंय."

मुरजानी यांनी JW PEI च्या वेबसाइटवरील त्या ड्रेसचा स्क्रीनशॉटही शेअर केला, जिथे त्याची किंमत $229 म्हणजेच जवळपास २१,९१७ रुपये इतकी होती.

जागतिक फॅशनमध्ये भारतीय संस्कृतीला स्थान मिळत असल्याचं स्वागतच आहे, पण ब्रँड्सनी डिझाइनच्या मूळ स्रोताला श्रेय द्यायला हवं, असं त्या म्हणाल्या. "ज्याचं श्रेय त्याला मिळायलाच हवं. याला 'एम्बेलिश्ड ड्रेप्ड ओव्हरले मॅक्सी ड्रेस' म्हणणं म्हणजे निव्वळ विनोद आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.

या उद्योजिकेने फॅशन कंपन्यांमध्ये विविधतेचं महत्त्वही अधोरेखित केलं. त्या म्हणाल्या की, केवळ जाहिरातींमधील मॉडेल्सपुरती विविधता मर्यादित न राहता, प्रोडक्ट तयार करणाऱ्या, त्यांना नाव देणाऱ्या आणि मार्केटिंग करणाऱ्या टीममध्येही विविध पार्श्वभूमीचे लोक असायला हवेत.

"म्हणूनच ब्रँड्सच्या बॅक-एंड टीममध्ये विविधता असणं महत्त्वाचं आहे. कारण मी खात्रीने सांगते, जर JW PEI मध्ये एखादी भारतीय व्यक्ती असती, तर तिने नक्कीच सांगितलं असतं की, 'अहो, हा ड्रेस नाही, ही साडी आहे'. त्यामुळे हे गरजेचं आहे," असं त्यांनी समजावून सांगितलं.

त्यांची ही पोस्ट ऑनलाइन प्रचंड व्हायरल झाली असून, अनेक युजर्सनी हा मुद्दा उचलून धरल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे, एका पारंपरिक भारतीय वस्त्राला नवीन वेस्टर्न स्टाईल म्हणून सादर केल्याबद्दल फॅशन लेबलवर जोरदार टीका होत आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

IndiGo Flight Damage : १७,००० फुटांवर इंडिगो विमानाला हवेत धक्का, पुढच्या भागाचे नुकसान; सुरक्षित लँडिंग
Nana Patekar | नेमकं काय झालं होता, नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला तेव्हा?