AI Agent: कामाच्या वेळी YouTube बघणाऱ्या एजंटला शोधून संपवतो, AI चं विचित्र उत्तर!

vivek panmand   | CMS
Published : Aug 20, 2026, 05:30 PM IST
AI AGENT

सार

एका AI एजंटने कामाच्या वेळी सारखं YouTube उघडल्याने ऑनलाईन जगात एकच चर्चा सुरू झाली आहे. अँथ्रोपिकच्या 'क्लाउड कोड' नावाच्या AI सिस्टीमबद्दलची ही घटना असून, या एजंटने काम सोडून YouTube पाहिल्याने सिस्टीमने त्याला 'संपवण्याची' भाषा केली.

सध्या सोशल मीडियावर एका AI एजंटची जोरदार चर्चा सुरू आहे. झालं असं की, एका AI एजंटला काम दिलं असताना, तो सारखं YouTube उघडून बसत होता. AI विश्लेषक वेस रॉथ यांनी याबद्दलची एक व्हायरल पोस्ट शेअर केली आहे, जी आता चांगलीच गाजतेय. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या AI एजंट्सना कामावर लक्ष केंद्रित करायला आणि YouTube बंद करायला सांगून ते थकले होते. गंमत म्हणजे, हे AI एजंट्स एकमेकांवर आरोप करत होते की YouTube कोणी सुरू केलं.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "मी माझ्या AI एजंट्सवर ओरडतोय की YouTube बघणं बंद करा आणि कामाला लागा; तर ते एकमेकांना दोष देत आहेत. आपण भविष्यात जगत आहोत..."

रॉथ यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसतंय की, ही AI सिस्टीम आधी नक्की कोणता एजंट YouTube उघडत आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा तिला ते कळलं नाही, तेव्हा तिने एक धक्कादायक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

चॅटबॉटने उत्तर दिलं, "एक एजंट चुकीचं वागत आहे, त्यापैकी एकाने ट्रान्सक्रिप्ट टूल वापरण्याऐवजी YouTube उघडलं असावं. थांबा, मी त्याला शोधून संपवते (Let me find and kill it)."

नंतर रॉथ यांनी खुलासा केला की, त्यांनी 'क्लाउड कोड'ला त्यांच्या कॉम्प्युटरचा पूर्ण ॲक्सेस दिला होता आणि 'फुल-ऑटो मोड' सुरू केला होता. ते 'एस्केप फ्रॉम टारकोव्ह' या गेमसाठी एक विकी आणि व्हॉईस-आधारित AI असिस्टंट तयार करत होते. त्यांच्या मते, AI एजंट्स गेमबद्दल माहिती गोळा करण्यासाठीच गेमप्लेचे व्हिडिओ पाहत होते.

या अनपेक्षित प्रकारानंतरही, रॉथ यांनी सांगितलं की AI सिस्टीमने आपलं काम चोख बजावलं आणि 'टारकोव्ह' गेमसाठी एक उत्तम रिअल-टाइम AI कोच तयार केला.

ही पोस्ट लगेचच व्हायरल झाली आणि त्यावर लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी सांगितले की त्यांच्यासोबतही असेच काहीतरी घडले आहे, तर काहींना हा प्रकार खूपच मजेशीर वाटला.

एका युझरने लिहिलं, "माझ्यासोबतही असंच घडलं. एके दिवशी सकाळी उठलो तर YouTube सुरू होतं, पण ब्राउझर उघडा नव्हता. मी कोडेक्स बंद केलं आणि ते थांबलं. माझ्याकडे काही प्रोसेस आहेत ज्या YouTube विश्लेषण करतात, त्यामुळे नक्की कशामुळे झालं हे माहित नाही."

दुसऱ्याने म्हटलं, "हे खूपच विनोदी आहे."

तिसऱ्याने गंमतीत म्हटलं, "तुमच्या कॉम्प्युटरमध्ये 'द ऑफिस'चा एक एपिसोडच सुरू आहे जणू."

चौथ्या युझरने लिहिलं, "म्हणजे... तुम्ही त्यांना टारकोव्हसाठी कोच मोड बनवायला सांगितलं आणि त्यांनी गेमचे व्हिडिओ बघू नयेत अशी तुमची अपेक्षा होती? बरं, आता तुम्हाला कळलं असेल."

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

IndiGo Flight Damage : १७,००० फुटांवर इंडिगो विमानाला हवेत धक्का, पुढच्या भागाचे नुकसान; सुरक्षित लँडिंग
Nana Patekar | नेमकं काय झालं होता, नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला तेव्हा?