India vs Pakistan Asia Cup 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना Sony सोडून येथे पाहा लाइव्ह

Published : Sep 12, 2025, 08:38 AM IST
India vs Pakistan Asia Cup 2025

सार

Asia Cup 2025 : येत्या 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना पार पडणार आहे. हा सामना पाहण्यासाठी प्रत्येक क्रिकेटप्रेमी उत्सुक असतो. अशातच सोनी सोडून तुम्हाला कुठे सामना पहायला मिळेल हे जाणून घ्या.

IND vs PAK Live Streaming Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेला सुरूवात झाली असून आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियानेही आपला पहिला सामना खेळला आहे. मात्र, क्रिकेटप्रेमींच्या मनात सर्वाधिक उत्सुकता असलेला प्रश्न म्हणजे भारत-पाकिस्तानचा सामना कुठे पाहायला मिळणार हा आहे. पूर्वी चाहते जिओ-हॉटस्टारवर सामने पाहत होते, पण यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

सोनी नेटवर्ककडे थेट प्रक्षेपणाचे अधिकार

यावेळी आशिया कपचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स किंवा जिओ-हॉटस्टारवर नसून सोनी नेटवर्कवर होत आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने यंदा आशिया कप 2025 चे थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंगचे अधिकार घेतले आहेत. टीव्हीवर सामने पाहायचे असतील तर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर ते पाहता येतील. विशेष म्हणजे, प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या भाषेत समालोचन ऐकण्याची सोयही उपलब्ध आहे.

मोबाईलवर Sony LIV अ‍ॅपवर थेट सामना

टीव्हीव्यतिरिक्त मोबाईलवरही सामना पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी Sony LIV अॅप डाउनलोड करावे लागेल. अ‍ॅप आधीपासून मोबाईलमध्ये असल्यास ते अपडेट करणे आवश्यक आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कुठेही आणि केव्हाही सामना पाहू शकता.

फॅन कोडवर स्वस्त दरात पाहण्याची सोय

सोनी व्यतिरिक्त क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. फॅन कोड अॅपवरही आशिया कपचे सामने पाहता येतात. मात्र, यासाठी शुल्क आकारले जाते. एखादा विशिष्ट सामना पाहण्यासाठी 25 रुपये मोजावे लागतात, तर संपूर्ण आशिया कप पॅक घेण्यासाठी 189 रुपये खर्च करावे लागतात.

14 सप्टेंबरला IND vs PAK सामना

क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने सर्वात मोठी लढत 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. टॉस संध्याकाळी 7.30 वाजता होईल, तर सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. त्यामुळे चाहत्यांनी या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण चुकवू नये.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!
EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, कर्ज घेणे होणार स्वस्त, जाणून घ्या फायदा