Rain Update : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट

Published : Aug 07, 2026, 08:34 AM IST
Rain Update

सार

भारतीय हवामान विभागाने 7 ऑगस्टसाठी देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असणार आहे. 

मुंबई : देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) आज अनेक राज्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. मध्य भारत, पूर्वोत्तर भारत आणि महाराष्ट्रातही दमदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा

उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय हरियाणा, दिल्ली, चंदीगड तसेच पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डोंगराळ भागांमध्ये भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य भारतात पावसाचा जोर कायम

मध्य भारतातही पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे नदी-नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. अशातच नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पूर्व भारत आणि बेटांनाही पावसाचा फटका

अंदमान-निकोबार बेटे, गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि झारखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.

महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Honda Activa : १० रुपयांची नाणी साठवून पठ्ठ्याने घेतली १.२३ लाखांची अ‍ॅक्टिव्हा!
Rahul Gandhi Protest : 'हात पकडला, धक्का दिला...', राहुल गांधींवर गरोदर महिला पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचा भाजपचा आरोप