अहमदनगर लोकसभेत 2 भाजप नेत्यांच झालं मनोमिलन, राम शिंदे आणि सुजय विखे हे सोबत करणार प्रचार

निवडणुकीच्या वेळेला सर्व पक्ष अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ राहिलेत.

vivek panmand | Published : Apr 2, 2024 1:07 PM IST

निवडणुकीच्या वेळेला सर्व पक्ष अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ राहिलेत. येथे माजी मंत्री राम शिंदे आणि खासदार सुजय विखे यांच्यातील वाद विकोपाला गेले होते पण निवडणुकीच्या तोंडावर सुजय विखे यांनी सर्वांची माफी मागून राम शिंदे यांच्याशी मनोमिलन केलं होते.

राम शिंदे आणि सुजय विखे यांच्यात काय झालं? 
राम शिंदे आणि सुजय विखे यांच्यात बैठक झाली असून यामधून वाद मिटल्याचं सांगितलं आहे. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांना माध्यमांना माहिती दिली आहे. आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती, यामध्ये सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यामध्ये साडेतीन तास चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमधील वाद संपल्याचे दिसून आले आहे. राम शिंदे आणि निलेश लंके यांच्यातील मित्रत्व लपून राहिलेलं नव्हते. 

सुजय विखे आणि राम शिंदे काय म्हणाले? - 
सुजय विखे यांनी राम शिंदे यांच्याशी असलेले मतभेद दूर झाल्याचे यावेळी म्हटले आहे. त्यांनी बोलताना घरचे आपल्यासोबत नसतील तर आपण जिंकणार कसे? त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. मागील वेळी अठरा हजारांचे लीड जामखेड शहरात होत यावेळी ते पंचवीस हजार करण्याचे ध्येय ठेवले आहे. मी साडेचार वर्षांपासून काम करतोय, नवीन उमेदवाराला यांना जास्त वेळ द्यावा लागणार आहे. 

राम शिंदे यांनी बोलताना सांगितलं, “काही प्रश्न आणि अडीअडचणीचं होत्या. त्यामुळे लोक आणि कार्यकर्त्यांच म्हणणे ऐकून घेणे आणि त्याला उत्तर देणे हीच भाजपची लोकशाही आहे. कार्यकर्त्याला निवडणुकीच्या निवडणुकीच्या विश्वासात घेऊन काम केलं तर ते आणखीन वेगाने पळतात. आज तीन तास मॅरेथॉन बैठक झाली आणि खासदारांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. गेल्या वेळेपेक्षा जास्त लेडीज जामखेडमधून देण्याचा निश्चय केला आहे. भाजप पक्षाचा आदेश हा सर्वमान्य आहे. आदेश आला की पक्षाचा मावळा त्यानुसार पळतो. मी एकाच पक्षाचा जुना सदस्य आहे. गेल्या वेळेपेक्षा जास्त मतांनी आमचा खासदार निवडून येईल.”
नक्की वाचा - 
 पतंजलीला जाहिरातीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिली चेतावणी, बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण होते हजर
तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा आजही आहेत? RBI च्या या 19 कार्यालयांमध्ये आजपासून करू शकता डिपॉझिट

Share this article