माझ्याकडे जेलमध्ये जाणे किंवा पक्षांतर करणे असे दोनच पर्याय होते, शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांनी फोडला बॉम्ब

Published : May 10, 2024, 12:59 PM IST
Ravindra Waikar

सार

शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांनी मोठा गौप्य्स्फोट केला आहे. त्यांनी माझ्याकडे जेलमध्ये जाणे किंवा पक्षांतर करणे असे दोनच पर्याय उपलब्ध होते असं म्हटले आहे. 

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे उत्तर प्रश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अत्यंत गौप्यस्फोट केला असून त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. जेलमध्ये जाणे किंवा पक्षांतर करणे असे दोनच पर्याय माझ्याकडे होते, असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे बोलताना हे बोलले की, माझ्या पत्नीचे नाव या प्रकरणात गोवण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात आलेला असताना वाईकरांनी केलेल्या या आरोपांमुळे सगळे राजकारण ढवळून निघाले आहे. 

रवींद्र वायकर काय म्हटले? - 
रवींद्र वायकर यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी हे सांगितले आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. माझ्याजवळ जेलमध्ये जाणे किंवा पक्षांतर करणे असे दोनच पर्याय होते. मी जड अंतकरणाने माझा पक्ष बदलला. या प्रकरणामध्ये माझ्या पत्नीचे नाव गुंतवण्यात आले होते, नियतीने अशी वेळ अगदी कोणावरही आणू नये असेही वायकर यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने कंठ आला दाटून - 
बाळासाहेब ठाकरे यांचा मी सुरुवातीपासून शिवसैनिक आहे. सुरुवातीपासून मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत काम केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून माझ्या खांद्यावर शिवधनुष्य आहे. मला ठाकरे घराण्याची साथ सोडावी लागली हे अतिशय दुःखद आहे. एखादी व्यक्ती जशी कुटुंबाला पारखी होते अगदी तसंच माझही झाल्याचे वायकर यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. माझं प्रकरण राजकीय असल्यामुळे माझ्यावर दबाव आला आणि पक्षांतर करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता असेही रवींद्र वायकर यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. 
आणखी वाचा - 
शरिया कायद्याबद्दल चिंता असून तो अमेरिकेतील लोकांवर लादला जाण्याची भीती वाटतेय, रीप चिप रॉय यांचे भाषण झाले व्हायरल
Akshaya Tritiya ला Gold खरेदी करण्याचा विचार करताय? फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी अशी तपासून पाहा सोन्याची शुद्धता

PREV

Recommended Stories

Parliament Winter Session : वंदे मातरमवर आज संसदेत चर्चा; PM मोदी दुपारी १२ वाजता सुरुवात करणार, नक्की काय आहे वाद घ्या जाणून
IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द