Human Body: माणसाचं शरीर किती गरमी सहन करू शकतं? जाणून घेऊया सविस्तर...

Published : Apr 25, 2026, 10:59 PM IST

Human Body: उन्हाळा चांगलाच तापलाय. घराबाहेर पडायचीही भीती वाटतेय. पण तुम्हाला माहित आहे का, आपलं शरीर नेमकं किती तापमान सहन करू शकतं? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

PREV
15
वाढता उन्हाळा

देशात दिवसेंदिवस उन्हाळा वाढत चालला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अनेक भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. त्यामुळे आपलं शरीर किती उष्णता सहन करू शकतं, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

25
'वेट बल्ब टेंपरेचर' म्हणजे काय?

आपलं शरीर फक्त तापमानच नाही, तर उष्णता आणि आर्द्रता यांचं मिश्रण अनुभवतं. यालाच 'वेट बल्ब टेंपरेचर' म्हणतात. शास्त्रज्ञांना आधी वाटायचं की, मानवी शरीर 35°C पर्यंत ही स्थिती सहन करू शकतं. पण नवीन अभ्यासानुसार, ही मर्यादा 30°C ते 31°C पर्यंतच आहे. या तापमानातच शरीर सुरक्षित राहू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात.

35
दमट हवा जास्त धोकादायक का असते?
कोरड्या हवामानात घामामुळे आपलं शरीर थंड होतं. घाम सुकतो आणि शरीराचं तापमान कमी होतं. पण जेव्हा हवेत दमटपणा जास्त असतो, तेव्हा घाम लवकर सुकत नाही. त्यामुळे शरीर थंड होण्याची प्रक्रिया थांबते. कमी तापमान असतानाही ही स्थिती धोकादायक ठरू शकते. म्हणूनच कोरड्या हवेपेक्षा दमट हवा जास्त धोकादायक असते.
45
'हीट स्ट्रोक'चा वाढता धोका

जेव्हा आपल्या शरीराचं तापमान 40°C च्या वर जातं, तेव्हा परिस्थिती गंभीर होते. या टप्प्यावर 'हीट स्ट्रोक'चा धोका वाढतो. यावेळी शरीराची थंड होण्याची यंत्रणा नीट काम करत नाही. यामुळे चक्कर येणं, गोंधळल्यासारखं होणं आणि अशक्तपणा अशी लक्षणं दिसतात. काही वेळा व्यक्ती बेशुद्धही होऊ शकते. वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवावर बेतू शकतं.

55
जास्त उष्णतेमुळे होणारे दुष्परिणाम
जास्त उष्णतेमुळे फक्त अस्वस्थ वाटत नाही, तर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवरही परिणाम होतो. मेंदूला सूज येऊ शकते, ज्यामुळे गोंधळ किंवा आकडी येण्याचा धोका असतो. हृदयाला जास्त काम करावं लागतं, त्यामुळे त्यावर ताण वाढतो. म्हणूनच उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं, उन्हात जास्त वेळ न थांबणं आणि दमट ठिकाणी काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories