Mobile News: जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग ॲप्समध्ये व्हॉट्सॲप पहिल्या क्रमांकावर आहे. युजर्सच्या गरजेनुसार सतत नवीन फीचर्स आणल्यामुळेच हे शक्य झालं आहे. आता व्हॉट्सॲपने असंच एक नवीन आणि इंटरेस्टिंग फीचर आणलं आहे.
आतापर्यंत मोबाईल रिचार्जसाठी आपल्याला दुसऱ्या ॲप्स किंवा वेबसाइटवर जावं लागायचं. पण आता व्हॉट्सॲपने थेट ॲपमधूनच मोबाईल रिचार्ज करण्याची सुविधा दिली आहे. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्स त्यांच्या व्हॉट्सॲप ॲपमध्येच प्रीपेड मोबाईल रिचार्ज करू शकतात. यासाठी व्हॉट्सॲपने 'पेयू' (PayU) या पेमेंट कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
24
कोणत्या टेलिकॉम कंपन्यांसाठी?
व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरमुळे जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्हीआय (Vi) यांसारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांचे प्रीपेड युजर्स सहजपणे आपला प्लॅन निवडून रिचार्ज करू शकतात. यामुळे आपलं रोजचं काम अधिक सोपं आणि जलद होणार आहे.
34
सहज वापर
व्हॉट्सॲपच्या होम स्क्रीनवर दिसणाऱ्या ₹ (रुपया) चिन्हावर क्लिक करा. त्यावर टॅप केल्यावर 'पेमेंट्स' सेक्शन उघडेल. तिथून तुम्ही 'मोबाईल रिचार्ज' हा पर्याय निवडू शकता. फक्त रिचार्जच नाही, तर मेट्रोसारख्या प्रवासाची तिकीटं बुक करण्याची सोयही इथे दिली आहे.
* व्हॉट्सॲपवर रिचार्ज करण्यासाठी, सर्वात आधी ₹ या आयकॉनवर टॅप करा.
* त्यानंतर 'Mobile Prepaid Recharge' हा पर्याय निवडा.
* ज्या मोबाईल नंबरवर रिचार्ज करायचं आहे, तो नंबर टाका.
* त्यानंतर संबंधित टेलिकॉम ऑपरेटरचं नाव कन्फर्म करा.
* तुम्हाला हवा असलेला प्लॅन निवडा.
* शेवटी UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करा.
* पेमेंट कन्फर्म करा आणि काही सेकंदातच तुमचं रिचार्ज पूर्ण होईल.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.