अभिनेत्री ऐश्वर्या रायची मुलगी शिकते त्या धीरूभाई अंबानी स्कूलची फी किती?

Published : Dec 22, 2025, 09:20 PM IST

Dhirubhai Ambani International School: सर्वात प्रतिष्ठित धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल  वार्षिक स्नेहसंमेलनामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. चला तर मग जाणून घेऊया DAIS मध्ये कोणत्या बोर्डानुसार शिक्षण दिले जाते आणि वार्षिक फी किती आहे. 

PREV
15
महानायक अमिताभ यांची नात आराध्याचा व्हिडिओ व्हायरल

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. धीरूभाई अंबानी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात तिचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी बच्चन कुटुंब उपस्थित होते. हा कार्यक्रम खूप व्हायरल झाला.

25
स्टार किड्स इथेच शिकतात

DAIS ही बॉलिवूड आणि व्यावसायिक कुटुंबांची पहिली पसंती आहे. शाहरुखचा मुलगा अबरामही इथेच शिकतो. इतकंच नाही, तर अनेक बॉलिवूड स्टार्सची मुलंही इथेच शिकतात. त्यामुळेच येथील कार्यक्रम व्हायरल होतात.

ही शाळा मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. 2003 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने याची स्थापना केली. नीता अंबानी या शाळेच्या संस्थापक अध्यक्षा आहेत.

ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि उच्च-क्रमांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. 1,30,000 चौरस फुटांच्या परिसरात अत्याधुनिक लॅब, डिजिटल क्लासरूम, स्पोर्ट्स सेंटर्स आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत.

35
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी किती?

या शाळेची फी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, LKG ते 7वी पर्यंतची फी 1.70 लाख रुपये, 8वी ते 10वी साठी 4.48 लाख रुपये आणि 11वी-12वी साठी 9.65 लाख रुपयांपर्यंत आहे.

45
या शाळेत आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धती

या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धती. येथे मुलांना IGCSE आणि IBDP साठी तयार केले जाते. 8वी पासून IGCSE आणि 11वी-12वी मध्ये IB डिप्लोमा शिकवला जातो. परदेशातील प्रवेशासाठी याचा उपयोग होतो.

55
या शाळेत प्रवेशासाठी काय करावे?

DAIS फक्त अभ्यासापुरते मर्यादित नाही. येथे कम्युनिकेशन स्किल्स, लीडरशिप, क्रिएटिव्हिटी आणि टीमवर्कवर विशेष लक्ष दिले जाते. स्टुडंट एक्सचेंज आणि मानसिक आरोग्य यासाठीही मदत पुरवली जाते. तुम्हालाही तुमच्या मुलांना या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल, तर प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. अधिकृत वेबसाइट dais.edu.in वर तुम्ही नवीन अपडेट्स तपासू शकता.

Read more Photos on

Recommended Stories