Air India Express Flight Tire Burst During Emergency Landing : सौदी अरेबियाच्या जेद्दाहमधून कोझिकोडला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर कोची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करताना विमानाचा एक टायर फुटला.
केरळमधून आखाती देशांसाठी दररोज विमानसेवा चालवली जाते. सौदी अरेबियाच्या जेद्दाहमधून १६० प्रवाशांसह एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान कोझिकोडसाठी निघाले. विमान हवेत असताना पायलटने लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे पाहिले.
24
तांत्रिक बिघाड
यानंतर, पायलटने विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला. कोची विमानतळ नियंत्रण कक्षाला माहिती देऊन परवानगी मिळाल्यानंतर, विमान कोझिकोडला न जाता कोचीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यास सांगण्यात आले.
34
लँडिंगवेळी फुटलेला टायर
विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विमानतळावर अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले होते. पायलटने विमान धावपट्टीवर उतरवताच मोठा आवाज होऊन टायर फुटला. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने सर्व 160 प्रवासी बचावले.
यानंतर, प्रवाशांना विमानातून सुखरूप उतरवून बसने कोझिकोडला पाठवण्यात आले. कर्मचारी विमानातील बिघाड आणि फुटलेला टायर दुरुस्त करण्याच्या कामात गुंतले आहेत. टायर फुटल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे.