Hit And Run New Law : देशभरात बस, ट्रकसह वाहन चालकांचे आंदोलन, जाणून घ्या नव्या 'हिट अ‍ॅण्ड रन' कायद्याबद्दल सविस्तर...

Hit And Run New Law : नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्यामुळे देशभरात ट्रक,बस आणि वाहन चालकांकडून आंदोलन केले जात आहे. या नव्या कायद्यानुसार हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी एखादा दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर….

Protest against hit and run law : नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्यामुळे देभरात ट्रक, बस आणि वाहन चालकांकडून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. बहुतांश राज्यात ट्रक चालकांकडून या कायद्याचा विरोध करण्यात येत आहे. 

कारण नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, पंजाबसह काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रक चालकांकडून निदर्शने केली जात आहेत.

सामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम
चालकांच्या नव्या चालक हिट अ‍ॅण्ड रन काद्याच्या विरोधातील निदर्शनांमुळे सामान्य नागरिकांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. बहुतांश ठिकाणी गरजेच्या सामानाच्या पूर्ततेवर प्रभाव पडत आहे. याशिवाय काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांची पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

तसेच चालकांच्या संपामुळे अनेक ठिकाणची सर्वसमान्य स्थिती अधिक बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणारे टँकर देखील नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्याच्या विरोधात उतरले आहेत.

नवा हिट अ‍ॅण्ड रन कायदा
अलीकडेच भारतीय न्याय संहितेत हिट अ‍ॅण्ड रन कायदा तयार करण्यात आला. येणाऱ्या काळात नवा हिट अ‍ॅण्ड रन कायदा लागू केला जाणार आहे. यामुळेच आता ट्रक, बस, वाहतूक चालकांकडून या कायद्याच्या विरोधात संप पुकारण्यात आला आहे. 

नव्या कायद्यानुसार, एखादा चालक हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा आणि सात लाख रूपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. म्हणजेच रस्ते अपघातात एखाद्याचे निधन झाल्यास आणि वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्यास तो नव्या कायद्यानुसार शिक्षेस पात्र ठरणार आहे.

याआधी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली जायची. तसेच जामीनही सहज मिळायचा. पण आता नव्या कायद्यामुळे वाहन चालक आक्रमक झाले आहेत. सरकारचे असे म्हणणे आहे की, जर दुर्घटनेतील व्यक्तीला वेळीच उपचार मिळल्यास त्याचा जीव वाचवला जाऊ शकतो.

आणखी वाचा: 

PhD Vegetable Seller : 11 वर्षे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून केले काम, आता घरोघरी विकताहेत भाजीपाला

धक्कादायक! महिलेला प्रेग्नेंट करा व 13 लाख रूपयांचे बक्षीस मिळवा, लोकांना गंडा घालणारी टोळी गजाआड

SPG कमांडोने सेल्फी घेण्यास रोखले, पण पंतप्रधान मोदींनी मुलांची इच्छा अशी केली पूर्ण

Share this article