'Hiring Junior Wife! अनुभवही नको'; लिंक्डइनवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये युजर्सने ठेवल्यास या अटी

Published : Apr 10, 2024, 08:32 AM ISTUpdated : Apr 10, 2024, 03:19 PM IST
Linkedin

सार

सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या एका व्यक्तीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर ज्युनिअर बायकोच्या शोधात आहे अशी पोस्ट शेअर केली होती. याच पोस्टवर आता युजर्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral Post : लिंक्डइन (linkedin) असे एक माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून व्यवसाय अथवा नोकरीसंदर्भातील व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जातात. पण काही पोस्ट अशा असतात ज्यामुळे युजर्सचे लक्ष आपल्याकडे वळले जाते. अशातच लिंक्डइनवर एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने शेअर केलेल्या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लिंक्डइनवरील पोस्टची चर्चा
जितेंद्र सिंह नावाच्या लिंक्डइन युजरने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले. या पोस्टमध्ये जितेंद्रने ‘Hiring Junior Wife’ असे लिहिले होते. याशिवाय ज्युनिअर बायकोसाठी पगार किती असेल, तिचा अनुभव किती असावा, इंटरव्यू किती वेळ सुरू राहिल आणि करियर संदर्भातही पोस्टमध्ये लिहिले होते. जिंतेंद्रची ज्युनिअर बायको हवी असल्याची पोस्ट पाहून काहींना धक्का बसलाय. तर काहींना जितेंद्रची पोस्ट आवडलेली नाही.

युजर्सने दिल्या अशा प्रतिक्रिया
एका युजरने लिहिले की, तुला डॉक्टरची गरज आहे. दुसऱ्याने सल्ला देत म्हटले की, अशी पोस्ट एखाद्या मॅट्रिमोनियल अ‍ॅपवर केल्यास तुझ्यासाठीच फायदेशीर होईल. तिसऱ्याने म्हटले की, काहीजण लिंक्डइनला देखील इंस्टाग्राम आणि फेसबुकसारखे करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, काही युजर्सला जितेंद्रच्या पोस्टची क्रिएटिव्हिटी आवडली आहे.

आणखी वाचा : 

लोकसभेसाठी देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत कोण?

उन्हाळी सुट्यांमध्ये आपण कुठं जाऊ शकता फिरायला? भारतातील शांत प्रवासाची ठिकाण घ्या जाणून

जया किशोरी यांचे किती झाले आहे शिक्षण, ऐकून तुम्ही व्हाल हैराण

PREV

Recommended Stories

Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!
EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, कर्ज घेणे होणार स्वस्त, जाणून घ्या फायदा