लोकसभा निवडणुकीच्या आधी एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.
छिंदवाडा येथून खासदार पदासाठी काँग्रेसकडून उभे असलेल्या नकुलनाथ यांची एकूण संपत्ती 716 कोटी आहे. त्यांनी याबाबतची घोषणा निवडणूक कागदपत्रांमध्ये केली आहे.
या सर्व उमेदवारांमधून 27 उमेदवार हे करोडपती असल्याची माहिती समजली आहे. काँग्रेसचे पूर्ण मंत्री दिनेश यादव, कमलेश्वर पटेल आणि सम्राट सिंह यांचे नावांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशमध्ये 88 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी 19 उमेदवारांवर केस दाखल आहेत. यापैकी नऊ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
यावेळी होणारी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असून जबलपूर लोकसभा मतदारसंघातून सर्वात जास्त म्हणजे 19 उमेदवारांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे.
नकुलनाथ यांची पत्नी प्रियानाथ या करोडपती आहेत. त्यांच्याकडे 19 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे माहिती दिली आहे. करोडपती असूनही त्यांच्याकडे एकही गाडी नाही.