PM Narendra Modi : वाराणसीत पोहोचताच PM नरेंद्र मोदींनी शिवपूर-फुलवारिया-लहारतारा मार्गाची केली पाहणी

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी उशीरा रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत शिवपूर-फुलवारिया-लहारतारा मार्गाची पाहणी केली.

Harshada Shirsekar | Published : Feb 23, 2024 5:31 AM IST / Updated: Feb 23 2024, 11:13 AM IST
16

PM Narendra Modi : गुजरात दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी गुरुवारी (22 फेब्रुवारी) वाराणसी येथे दाखल झाले. येथे पोहोचताच पंतप्रधान मोदी यांनी रात्री 11 वाजता शिवपूर-फुलवारिया-लहारतारा (Shivpur- Phulwaria- Lahartara Marg) मार्गाची पाहणी केली. यावेळेस त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील होते. या मार्गाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. हा मार्ग शहराच्या दक्षिण भागामध्ये BHU, BLW अन्य ठिकाणाच्या आसपास राहणाऱ्या सुमारे पाच लाख नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. 

26

या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे. महत्त्वाचे म्हणजे बीएचयू ते विमानतळ गाठण्यासाठी आता 75 मिनिटांऐवजी केवळ 45 मिनिटांचा प्रवास करावा लागत आहे. त्याचप्रमाणे लहारतारा ते कचरी हे अंतर 30 मिनिटांवरून 15 मिनिटांवर आले आहे.

36

शिवपूर-फुलवारिया-लहारतारा मार्गाची बांधणी करण्यासाठी एकूण 360 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहेत.

46

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (23 फेब्रुवारी) सकाळी 11:15 वाजता संत गुरू रविदास यांच्या जन्मस्थानी पूजा करून त्यांचे दर्शन घेतील.

56
  • पंतप्रधान मोदी सकाळी 11:30 वाजता संत गुरू रविदास यांच्या 647व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील.
  • दुपारी दीड वाजता पंतप्रधान मोदी वाराणसीच्या करखियाव येथील UPSIDA ॲग्रो पार्कमध्ये असलेल्या बनासकांठा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या दूध प्रक्रिया युनिट बनास काशी संकुलला भेट देतील.
66

यानंतर नियोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वाराणसीमध्ये 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी केली जाईल.

आणखी वाचा

Lok Sabha Election 2024 : BJPच्या 'फिर एक बार, मोदी सरकार' प्रचार गीतामध्ये 24 भाषांचा समावेश WATCH VIDEO

Shri Kalki Dham Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्री कल्कि धाम मंदिराची पायाभरणी PHOTOS

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : गडकोट-किल्ले हा आपला ठेवा, तो जपण्याचे काम करू - CM एकनाथ शिंदे

Share this Photo Gallery