उष्णतेचा हृदयावर होतो परिणाम, प्रतिबंध करण्याचे मार्ग घ्या जाणून

Published : Apr 10, 2024, 01:38 PM IST
hot weather summer kolkata north and south bengal

सार

तीव्र उष्णता आणि उच्च तापमानामुळे सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर उकडत असल्याचे दृश्य आपल्याला दिसून येत आहे.

तीव्र उष्णता आणि उच्च तापमानामुळे सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर उकडत असल्याचे दृश्य आपल्याला दिसून येत आहे. या उष्णतेच्या वातावरणाचा शरीरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आकडेवारी सांगते की उष्णतेच्या सतत संपर्कामुळे उष्माघात, उष्णतेचा ताण आणि इतर आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. 

उष्णतेमुळे स्ट्रोक कसा येतो? 
अशक्तपणा, उलट्या, मळमळ, जलद हृदयाचे ठोके, घाम येणे, डोकेदुखी, चक्कर येणे आणि बरेच काही यामुळे होऊ शकते. उष्णतेमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता असते. तुमच्या शरीराच्या गंभीर भागांमध्ये रक्त प्रवाहाच्या कमतरतेमुळे हा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. शरीरातील निर्जलीकरण होऊन रक्त घट्ट होते, त्यामुळे हृदयाला पंप करणे अवघड असते. स्ट्रोकचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये वाढत जाते. 
 

लक्षणे घ्या जाणून - 
उष्णतेमुळे स्ट्रोक आल्यास खालील लक्षणे आपल्याला दिसून येतील. एकतर्फी अशक्तपणा, बोलण्याची क्षमता कमी होते, अस्पष्ट भाषण, चेहऱ्याच्या एका बाजूला स्नायूंचे नियंत्रण कमी होते, दृष्टी धूसर होत जाते, चक्कर येणे, मळमळ आणि उलटी, मान कडक होते स्मृती भ्रंश होतो, डोकेदुखी होते असे स्ट्रोक आल्यास शरीरामध्ये लक्षणे दिसून येतात. 
आणखी वाचा - 
छत्तीसगढमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 12 मजुरांचा झाला घटनास्थळी मृत्यू
'Hiring Junior Wife! अनुभवही नको'; लिंक्डइनवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टवर युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

PREV

Recommended Stories

आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!
Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!