उत्तराखंड पोलिसांनी मोठी कारवाई करत हलद्वानी हिंसाचारातील मास्टरमाइंड अब्दुल मलिकला अटक केली आहे. अब्दुल मलिकला दिल्लीतून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Haldwani Violence : 8 फेब्रुवारीला हलद्वानी हिंसाचाराची घटना घडली. या हिंसाचारातील मास्टरमाइंड अब्दुल मलिक (Abdul Mailk) याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अब्दुलचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. आता उत्तराखंड पोलिसांनी अब्दुलला दिल्लीतून अटक केली आहे.
उत्तराखंडातील बनभूलपुरा येथे 8 फेब्रुवारी (2024) रोजी झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड अब्दुल मलिक आहे. खरंतर, उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे अवैध मदरसा आणि मशीद पाडण्यासाठी प्रशासनासह महापालिकेचे अधिकारी गेले होते. ज्या ठिकाणी अवैध बांधकाम पाडले जाणार होते त्या जागा अब्दुल मलिकच्या ताब्यात होत्या. बांधकाम पाडताना घडलेल्या हिंसाचारात महापालिकेच्या 2.44 कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले.
महापालिकेच्या नुकसान भरपाईसाठी अब्दुल मलिकला नोटीस धाडण्यात आली होती. पण नोटीसला काहीही उत्तर देण्यात आले नाही. आता तहसीलच्या माध्यमातून वसुलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तहसीलदार सचिन कुमार यांनी म्हटले की, “वसूलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सात दिवसांची नोटीस धाडण्यात आली आहे. उत्तर न मिळाल्यास अचल मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाईल.”
नक्की काय घडले होते?
उत्तराखंडमधील हल्द्वानी 8 फेब्रुवारीला अवैध मदरसा आणि मशीद पाडण्यावरुन हिंसाचार घडल्याची घटना घडली. खरंतर अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर केला जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनावर दडगफेक करण्यास सुरुवात केली. याशिवाय वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली होती.
आणखी वाचा :