Gold Price Today : सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, 1 तोळा सोने चक्क 1 लाख 13 हजार 176 रुपयांना!

Published : Sep 10, 2025, 10:30 AM IST

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या दरात मंगळवारी तब्बल १,४४२ रुपयांची भर पडली असून, जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख १३ हजार १९७ रुपये इतका झाला आहे.

PREV
14
सोन्याच्या भावात मोठी उसळी

मंगळवारी सोन्याच्या किमतींमध्ये विक्रमी वाढ नोंदवली गेली. एका दिवसात तब्बल ५,०८० रुपयांनी वाढ होऊन सोने १,१२,७५० रुपये प्रति १० ग्रॅम या नव्या उच्चांकावर पोहोचले. त्याचबरोबर चांदीचे दरदेखील २,८०० रुपयांनी उसळून १,२८,८०० रुपये प्रतिकिलो (सर्व करांसह) झाले. जागतिक बाजारपेठेत गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळल्याने ही तेजी आली आहे.

24
जळगावच्या सुवर्णबाजारपेठेत नवा उच्चांक

जळगावमध्ये सोन्याचे भाव पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर गेले आहेत. मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह १,१३,१९७ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवले गेले. गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ होत असून फक्त एका दिवसात जवळपास दीड हजार रुपयांची उसळी दिसली. १ सप्टेंबरला सोन्याचा दर १,०८,४५९ रुपये होता, जो ९ सप्टेंबरपर्यंत ४,७३८ रुपयांनी वाढला आहे. वाढत्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असले तरी मोठे गुंतवणूकदार सोन्याकडेच वळत असल्याचे सराफ व्यावसायिक सांगतात.

34
चांदीतही तेजी

सोन्याबरोबरच चांदीतदेखील मंगळवारी मोठी वाढ झाली. गेल्या आठवडाभरापासून स्थिर असलेले भाव तब्बल १,०३० रुपयांनी वाढून जीएसटीसह १,२९,७८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले. अचानक वाढ झाल्याने मागणी काहीशी घटली आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने ग्रॅमने होणाऱ्या खरेदीत ३० टक्क्यांपर्यंत घट दिसून आली असली तरी सण-उत्सवांचा हंगाम असल्याने खरेदी पूर्णपणे थांबलेली नाही.

44
सोन्याच्या आणि चांदीच्या दरांवर परिणाम करणारे घटक

सोन्या-चांदीच्या किंमती दररोज बदलतात आणि त्यामागे विविध कारणे असतात:

  • डॉलर-रुपया विनिमय दर > रुपया कमजोर झाला किंवा डॉलर महागला तर भारतात सोने महाग होते.
  • आयात शुल्क आणि कर > भारतातील बहुतेक सोने आयात केलेले असल्याने आयात शुल्क आणि जीएसटीचा थेट परिणाम किंमतींवर होतो.
  • जागतिक बाजारातील परिस्थिती > युद्ध, आर्थिक मंदी, व्याजदरांतील बदल यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात.
  • सांस्कृतिक मागणी > विवाह, सण-उत्सव यामध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे मागणी टिकून राहते.
  • महागाई आणि सुरक्षित गुंतवणूक > महागाई वाढल्यास लोक सोन्यात गुंतवणूक करतात कारण दीर्घकाळात सोने सुरक्षित परतावा देणारा पर्याय ठरतो.
Read more Photos on

Recommended Stories