Girish Mahajan | दुष्काळग्रस्तांना मदत कशी केली जाणार, महाजन यांची माहिती

Girish Mahajan | दुष्काळग्रस्तांना मदत कशी केली जाणार, महाजन यांची माहिती

Published : Oct 05, 2026, 03:02 PM IST

दुष्काळाच्या मदतीसाठी पंचनाम्यांमध्ये जिओ टॅगिंग आणि शेतकऱ्यांच्या सह्या घेण्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली. पंचनाम्यांनंतर तक्रारी होऊ नयेत आणि प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी, यासाठी शेतकऱ्यांसमोर पंचनामे करून त्यांच्या सह्या घेण्याची व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीतून सुटू नये आणि सर्वांना न्याय मिळावा, हा त्यामागचा उद्देश असल्याचे महाजन म्हणाले. उडीद, मूग आणि मका यांसारखी पिके आधीच काढली गेली असली तरी नुकसान झालेल्यांना मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले. यंदा 40 दिवसांच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना मदत करण्याचे वारंवार सांगितल्याचे महाजन म्हणाले. फळबागा, ठिबक सिंचन तसेच रावेरमधील केळी पिकाचे उदाहरण देत प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकार सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत असल्याचे सांगत कर्जमाफी, वीज बिल माफी आणि सौरपंपांचा उल्लेख करत महाजन यांनी विरोधकांवरही टीका केली.