Thackeray brothers march.Girish Mahajan | ठाकरे बंधूंच्या मोर्चावर गिरिश महाजन म्हणतात, हे तर सर्व

Thackeray brothers march.Girish Mahajan | ठाकरे बंधूंच्या मोर्चावर गिरिश महाजन म्हणतात, हे तर सर्व

Published : Oct 05, 2026, 03:02 PM IST

मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली. आपल्या विरोधात निकाल लागल्यानंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, निवडणूक आयोग तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे हा उद्योग झाल्याचे महाजन म्हणाले. मोर्चे काढण्याऐवजी महाराष्ट्रात फिरून लोकांमध्ये जावे, असा सल्लाही त्यांनी दिला. आंदोलनात नकली ज्ञानेश कुमार यांना आणून त्यांचा राजीनामा घेण्याच्या प्रकाराला महाजन यांनी ‘नौटंकी’ आणि ‘पथनाट्य’ म्हटले. लोकांची कामे करा आणि आपल्या लोकांच्या संपर्कात राहा, असेही त्यांनी म्हटले. मोर्चातील ‘उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान, राज ठाकरे भावी मुख्यमंत्री’ अशा बॅनर्सवरही महाजन यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करण्याची कल्पना संजय राऊतांच्या डोक्यातील असल्याचे सांगत, मुख्यमंत्री होण्यासाठी आधी आमदार निवडून आणावे लागतात, असा टोला महाजन यांनी लगावला.