Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार

Republic Day : 26 जानेवारी 2024 रोजी देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिनामिनित्त प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हजेरी लावणार आहेत.

Chanda Mandavkar | Published : Dec 22, 2023 6:16 AM IST / Updated: Jan 25 2024, 02:03 PM IST

Republic Day 2024 : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (France PM Emmanuel Macron) हे पुढील वर्षात (2024) 26 जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) उपस्थितीत राहणार असल्याची बातमी समोर आली होती. भारत सरकारकडून बिडेन यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थिती लावतील. यंदाच्या वर्षात (2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस बॅस्टिल डे (Bastille Day)निमित्त उपस्थिती लावली होती. 

फ्रान्सच्या या राष्ट्रीय दिवसाचे आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आले होते. या दरम्यान, वर्ष 1789 मधील फ्रेंच क्रांतिच्या स्मरणार्थ परेडचे आयोजन करण्यात आले होते. या परेडमध्ये भारतीय सैन्याचाही सहभाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परेडमध्ये गेस्ट ऑफ ऑनरच्या (Guest of Honor) रूपात आमंत्रित करण्यात आले होते.

दिल्लीत आले होते मॅक्रॉन
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे यंदाच्या वर्षात (2023) भारताने आयोजित केलेल्या जी20 शिखर परिषदेत (G20 Summit 2023) सहभागी होण्यासाठी दिल्लीला आले होते. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यामध्ये संवादही झाला होता.

वर्ष 2023 मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह यांनी लावली होती हजेरी
वर्ष 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी (Abdel Fattah al-Sisi) यांनी हजेरी लावली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताकडून प्रत्येक वर्षी परदेशातील नेतेमंडळींना मुख्य पाहुण्यांच्या रूपात आमंत्रित केले जाते. वर्ष 2021 आणि 2022 मध्ये कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.

आणखी वाचा: 

जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ पुन्हा Down, युजर्सकडून तक्रारींचा पाऊस

IPL Auction 2024: आयपीएलच्या लिलावात 10 संघ 74 खेळाडू, वाचा कोणत्या Playerसाठी किती लावली बोली

काय सांगता! चक्क राम मंदिराच्या थीमवर आधारित तयार केलाय नेकलेस, पाहा VIDEO

Read more Articles on
Share this article