Republic Day 2024 : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे भारतीय विद्यार्थ्यांना गिफ्ट, या सुविधेची केली घोषणा

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी उपस्थिती लावली. या निमित्त मॅक्रॉन यांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

Republic Day 2024 : भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (France President Emmanuel Macron) यांनी यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. या निमित्त मॅक्रॉन यांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये मॅक्रॉन यांनी म्हटले की, वर्ष 2030 पर्यंत फ्रान्समध्ये कमीत कमी 30 हजार विद्यार्थी शिक्षण घेतील. हेच लक्ष्य घेऊन आपण पुढे जात आहोत. याशिवाय हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना फ्रेंच भाषा शिकवली जाणार
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले की, “आम्हाला भारतीय विद्यार्थ्यांची मदत करायची आहे. जे विद्यार्थी फ्रेंच भाषा (French Language) बोलू शकत नाही, त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय वर्ग तयार केले जातील. याशिवाय फ्रेंच भाषा शिकण्यासाठी सेंटर देखील स्थापन केले जातील. याशिवाय फ्रान्समध्ये शिकणाऱ्या कोणत्याही माजी भारतीय विद्यार्थ्यांसाठी आम्ही व्हिसा प्रक्रिया सोपी करू.”

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण पाठण्यात आले होते. पण अखेरच्या क्षणी बायडेन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्यास नकार दिला. यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले.

आणखी वाचा : 

BRICS : भारत-रशिया लवकरच डिजिटल अर्थव्यवस्था तयार करणार, असा पूर्ण होणार अजेंडा

Bharat Ratna to Karpoori Thakur : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, मोदी सरकारची मोठी घोषणा

PM Narendra Modi Schedule : नरेंद्र मोदी जयपुर ते दिल्लीदरम्यान या कार्यक्रमांना लावणार उपस्थिती, जाणून घ्या पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल सविस्तर

Read more Articles on
Share this article