Padma Awards 2024 : पद्म पुरस्कारांची घोषणा, समाजासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या नायकांचा गौरव

Padma Awards 2024: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा 5 पद्मविभूषण (Padma Vibhushan Awards), 17 पद्मभूषण (Padma Bhushan Awards 2024) व 110 पद्मश्री असे एकूण 132 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Padma Awards 2024 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रामध्ये असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (25 जानेवारी) पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली. पाच जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पाच जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला (Vyjayantimala), अभिनेता कोनिडेला चिरंजीवी (Konidela Chiranjeevi), प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम् (Padma Subrahmanyam) आणि माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (M Venkaiah Naidu) यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक (Bindeshwar Pathak) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार  

पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे. यामध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक (Ram Naik), संगीतकार प्यारेलाल, हृदयरोग तज्ज्ञ आश्विन मेहता,  कुंदन व्यास, जेष्ठ पत्रकार होर्मुसजी एन कामा यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

देशाच्या नागरी पुरस्कारातील मानाचे पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अभिनंदन केले आहे. राज्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्यांतील सहा मान्यवरांना पद्मभूषण (Padma Vibhushan Awards 2024) आणि सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार (Padma Bhushan Awards 2024) जाहीर झाले आहेत.

या मान्यवर पुरस्कारार्थींचे सार्वजनिक कार्य, सामाजिक आणि वैद्यकीय, कला, क्रीडा (Sports), साहित्य- शिक्षण, उद्योग व व्यापार, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तरूण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या सर्वांनी आपल्या कार्याने महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यात योगदान दिले आहे. या सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले आहे.

पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी

पद्मश्री पुरस्काराचे मानकरी

आणखी वाचा : 

PM Narendra Modi : भाजपचा जाहीरनामा कसा असावा? NaMo अ‍ॅपद्वारे थेट पंतप्रधान मोदींना पाठवा सूचना

Watch Video : ‘…म्हणूनच सर्वजण मोदींना निवडतात’, भाजपाने लाँच केली प्रचार मोहिमेची थीम

Lok Sabha Elections 2024 : या तारखेला होणार का लोकसभा निवडणुका? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले उत्तर

Share this article