'PM मोदी पंजाबमध्ये पुन्हा आल्यास गंभीर परिणाम होतील', आंदोलनकर्त्या शेतकऱ्याची धमकी Watch Viral Video

Farmers Protest 2024 : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकऱ्याने उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिल्याचे ऐकायला मिळत आहे.

 

Farmers Protest 2024 : राजधानी नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या आंदोलनादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये कथित स्वरुपात एक शेतकरी उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उघडपणे धमकीवजा इशारा देत असल्याचे ऐकायला मिळत आहे.

"जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये पुन्हा पाऊल ठेवण्याचे धाडस केले तर त्यांचे गंभीर परिणाम होतील. यावेळेस त्यांना सोडणार नाही", अशा शब्दांत या शेतकऱ्याने पंतप्रधान मोदींना उघड धमकी दिली आहे. एशियानेट न्यूज या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

पाहा व्हिडीओ

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त

राजधानी नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे परिसरामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता मध्य दिल्लीमध्ये आणि हरियाणाच्या सीमेवर बॅरिकेड्सही लावण्यात आले आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर बॅरिकेड्स, काँक्रीट ब्लॉक्स, लोखंडी खिळे आणि कंटेनर भिंती अडथळे निर्माण करण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत.

MSPबाबत भाजप सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर संघांच्या नेतृत्वामध्ये अनेक शेतकऱ्यांनी 'दिल्ली चलो'चा नारा देत मंगळवारी (13 फेब्रुवारी) नवी दिल्ली गाठली. पीकांसाठी किमान आधारभूत किंमत आणि कर्जमाफी या कायद्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

आणखी वाचा

RRB Technician Recruitment 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशिअन पदासाठी 9 हजार रिक्त जागांवर होणार भरती, इतका मिळणार पगार

PF Interest Rate : नोकरदारांसाठी सरकारची मोठी घोषणा, आता PF खात्यावर मिळणार इतके टक्के व्याज

VIDEO : चिखलात अडकलेल्या BJP नेत्याची सुटकेसाठी धडपड, म्हणाले-'आज JCBची परीक्षा होती'

Share this article