RRB Technician Recruitment 2024:रेल्वे भरती बोर्डतर्फे टेक्निशिअन ग्रेड-1सिग्नल पदासाठी 1 हजार 100 जागा व टेक्निशिअन ग्रेड 3 पदासाठी 7 हजार 900 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली आहे. 9 मार्चपासून अर्ज प्रक्रियेस सुरुवात होईल.
RRB Technician Recruitment 2024 : रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या पाच हजार जागांवरील भरती प्रक्रियेनंतर आता रेल्वे भरती बोर्डाद्वारे (RRB) टेक्निशिअन पदाकरिता 9 हजार जागांवर भरती करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याद्वारे अर्ज करण्याच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. अधिसूचनेनुसार या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 मार्च 2024 पासून सुरू केली जाईल.
रेल्वे टेक्निशिअन भरतीमध्ये नोंदणी करू इच्छिणारे सर्व उमेदवार भारतीय रेल्वेच्या indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 8 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
RRB Recruitment 2024: भरती प्रक्रिया तपशील
भारतीय रेल्वेतर्फे या भरती प्रक्रियेद्वारे टेक्निशिअन पदाकरिता एकूण 9 हजार रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशिअन ग्रेड 1 सिग्नलच्या 1 हजार 100 पदांवर आणि टेक्निशियन ग्रेड 3च्या 7 हजार 900 रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
Railway Technician Vacancy 2024: पात्रता आणि निकष
या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI विषयामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.
टेक्निशिअन ग्रेड 1 सिग्नलच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय 36 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
टेक्निशिअन ग्रेड 3च्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कमाल वय 33 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
1 जुलै 2024 रोजी वयाची गणना केली जाईल.
RRB Technician Vacancy 2024: अर्ज शुल्क
RRB टेक्निशिअन भरती 2024 करिता अर्ज दाखल करण्यासोबतच उमेदवाराला निश्चित करण्यात आलेले शुल्क देखील जमा करावे लागेल.
शुल्क जमा केल्यानंतरच उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाईल.
अन्य सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
SC, ST, माजी सैनिक, PWBD, ट्रान्सजेंडर, EWS आणि महिला उमेदवारांकडून 250 रुपये शुल्क आकारण्यात येईल.