PM Modi 76th Birthday | Narendra Modi 25 Years | नरेंद्र मोदी म्हणजे विद्यापीठ: देवेंद्र फडणवीस

PM Modi 76th Birthday | Narendra Modi 25 Years | नरेंद्र मोदी म्हणजे विद्यापीठ: देवेंद्र फडणवीस

Published : Sep 17, 2026, 09:05 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सरकारप्रमुख म्हणून त्यांच्या 25 वर्षांच्या कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर ‘एक दिवा आशीर्वादाचा’ कार्यक्रमात सहभाग घेतला. नागपूरमधील आपल्या मतदारसंघात मोदी सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या 500 लाभार्थ्यांनी एकत्र येऊन आशीर्वादाचा दिवा लावल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रासह देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याचेही फडणवीस म्हणाले. मोदी यांनी भारताला नव्या उंचीवर नेले असून विकसित भारताचे स्वप्न ते लवकर पूर्ण करतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मोदींसोबतच्या अनुभवाबाबत विचारले असता, “मोदीजी अशा विद्यापीठासारखे आहेत, ज्यांच्याकडून तुम्ही सतत शिकू शकता,” असे त्यांनी म्हटले. मोदी हे जगातील आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी असल्याचा दावा करत विविध घटकांशी व्यापक स्वरूपात जोडले गेलेले पंतप्रधान म्हणून त्यांचे वेगळे व्यक्तिमत्त्व असल्याचे फडणवीस म्हणाले. विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांबाबत विचारले असता त्यांनी नेमके काय म्हटले हे आपल्याला माहिती नसल्याचे सांगत, ते रोज जे बोलतात ते आपण गांभीर्याने घेत नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

03:04PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या सेवेवर पीयूष गोयल
04:36Disha Salian | आदित्य ठाकरेंवर सतीश सालियन यांचा पुराव्यांचा दावा | Aaditya Thackeray
05:57PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींनी निवृत्ती घ्यावी: संजय राऊत | Marathwada Farmers Relief
03:10PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी मुरलीधर मोहोळांचा सेवा उपक्रम
14:50Devendra Fadnavis | शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही: देवेंद्र फडणवीस | Marathwada Farmers Relief
02:17Manoj Jarange | मुंबईला निघताना कुटुंबासमोर मनोज जरांगे भावुक | Maratha Andolan
09:39Manoj Jarange | मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं सहकार्याचं आवाहन Eknath Shinde on Jarange
03:36मुंबईसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून रवाना | Manoj Jarange | Maratha Protest
03:23Manoj Jarange | जरांगे अंतरवलीतून निघताच मुख्यमंत्र्यांची पहिलीच प्रतिक्रिया fadanvis on jarange