Fact Check: 30 जूननंतर कागदी नोटा बंद होणार? RBI आणणार प्लास्टिकच्या नोटा?

Published : Jun 11, 2026, 09:02 PM IST

Fact Check: सध्या सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी पसरतेय. 30 जून 2026 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सध्याच्या कागदी नोटा बंद करून त्यांच्या जागी प्लास्टिकच्या नोटा आणणार आहे, असा दावा केला जातोय. यात किती तथ्य आहे?

PREV
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी काय आहे?

काही सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, RBI लवकरच सर्व कागदी नोटा रद्द करून त्यांच्या जागी प्लास्टिक किंवा पॉलिमरच्या नोटा आणणार आहे. विशेषतः 30 जून 2026 नंतर जुन्या नोटा चालणार नाहीत, असा प्रचार केला गेला. ही बातमी वेगाने पसरल्यामुळे लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आणि अनेकांनी आपल्याकडील नोटांच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली.

25
PIB फॅक्ट चेकने काय सांगितले?

या व्हायरल बातमीवर केंद्र सरकारचा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) फॅक्ट चेक विभागाने खुलासा केला आहे. सोशल मीडियावर पसरलेली ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. RBI ने कागदी नोटा बंद करण्याबद्दल किंवा 30 जून 2026 पासून प्लास्टिकच्या नोटा आणण्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, असं PIB ने सांगितलं. लोकांनी अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि त्या फॉरवर्ड करू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

35
RBI प्लास्टिक नोटांवर विचार करत आहे का?

प्लास्टिक किंवा पॉलिमर नोटांच्या विषयावर RBI ने पूर्णपणे मौन बाळगलेलं नाही. 5 जून 2026 रोजी झालेल्या चलनविषयक धोरण आढावा बैठकीनंतर संजय मल्होत्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, पॉलिमर नोटा आणण्यावर विचार सुरू आहे. मात्र, हा विषय अजूनही प्राथमिक टप्प्यात असून, अंतिम निर्णय झालेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. पॉलिमर नोटांचे फायदे आणि तोटे यांचा अभ्यास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. याचा अर्थ, प्लास्टिकच्या नोटा लगेचच बाजारात येतील, असं म्हणायला कोणताही आधार नाही.

45
नवीन नोटा आल्यास जुन्या नोटांचे काय होणार?

RBI च्या धोरणानुसार, जेव्हा नवीन डिझाइनच्या नोटा येतात, तेव्हा जुन्या नोटा लगेचच चलनातून बाद होत नाहीत. साधारणपणे, जुन्या आणि नवीन दोन्ही प्रकारच्या नोटा काही काळासाठी एकत्र चलनात असतात. कालांतराने, ज्या जुन्या नोटा खूप जीर्ण झाल्या आहेत किंवा पुन्हा जारी करण्यायोग्य नाहीत, त्यांना RBI हळूहळू चलनातून काढून टाकते. त्यामुळे नवीन डिझाइनची नोट आली म्हणजे जुन्या नोटा एका झटक्यात बंद होतील, असा त्याचा अर्थ होत नाही.

55
सध्या भारतीय चलनी नोटा कशा तयार होतात?

सध्या भारतात छापल्या जाणाऱ्या नोटा सामान्य कागदापासून बनवलेल्या नाहीत. यांच्या निर्मितीसाठी 100 टक्के कापसावर (Cotton) आधारित विशेष करेन्सी पेपर वापरला जातो. यामुळे नोटा जास्त काळ टिकतात. जर चलनातून बाद झालेल्या किंवा खराब झालेल्या नोटा बँकांपर्यंत पोहोचल्या, तर त्यांना RBI कडे पाठवून नियमांनुसार नष्ट (scrap) केलं जातं.

Read more Photos on

Recommended Stories