Biryani Controversy: 370 रुपयांची बिर्याणी, एक व्हायरल व्हिडिओ अन् नोकरी गमावली!

Published : Jun 10, 2026, 10:00 PM IST

Biryani Controversy: गुरुग्राममधील 22 वर्षीय हिमांशू जांग्रा या तरुणाला त्याच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे नोकरी गमवावी लागली आहे. बिर्याणी डेटबद्दल केलेल्या या व्हिडिओनंतर कंपनीने घेतलेल्या निर्णयावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

PREV
14
हिमांशू जांग्रा

हिमांशू जांग्रा नावाच्या या तरुणाने त्याच्या डेटवर झालेल्या 370 रुपयांच्या बिर्याणीच्या खर्चाबद्दल एक गंमतीशीर व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये त्याने डेटिंगचा अनुभव 'पैसा वसूल' असल्याचं म्हटलं. पण काही लोकांनी याला महिलांचा अपमान करणारा प्रकार म्हटलं आणि टीका सुरू केली. हा व्हिडिओ काही तासांतच लाखो लोकांनी पाहिला आणि व्हायरल झाला.

24
कामावरून हकालपट्टी
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिमांशू ज्या कंपनीत काम करत होता, तिचं नावही सोशल मीडियावर फिरू लागलं. यामुळे कंपनीवर दबाव वाढला आणि अखेर कंपनीने हिमांशूला कामावरून काढून टाकल्याचं म्हटलं जातंय.
34
नेटकऱ्यांचा प्रश्न
पण वाद इथेच थांबला नाही. हिमांशूला कामावरून काढण्याच्या कंपनीच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. 'एका व्हायरल व्हिडिओमुळे कोणाची नोकरी घेणं कितपत योग्य आहे?' असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला. काहींनी तर कंपनीच्या बॉसवर टीका करत आपला राग व्यक्त केला.
44
सोशल मीडियाचा प्रभाव

या घटनेनंतर सोशल मीडियावर जणू मतांचं युद्धच सुरू झालं आहे. 'सार्वजनिक ठिकाणी काही पोस्ट करताना जबाबदारीने वागलं पाहिजे,' असं एक गट म्हणतोय, तर 'फक्त व्हायरल झाल्यामुळे नोकरी गमावणं हा अन्याय आहे,' असं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे. एकूणच, 370 रुपयांच्या बिर्याणीपासून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक स्वातंत्र्य, नोकरी आणि सोशल मीडियाच्या प्रभावावरच्या मोठ्या चर्चेचं कारण बनला आहे.

Read more Photos on

Recommended Stories