झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या चौकशीसाठी ईडीचे पथक दिल्लीतील मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. ईडीचे पथक निवासस्थानी पोहोचण्याआधीच हेमंत सोरेन अज्ञात स्थळी निघून गेले आहेत.
ED Officials Visit at Jharkhand CM Delhi House : ईडीचे पथक सोमवारी (29 जानेवारी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले. पण हेमंत सोरेन निवासस्थानी नव्हते. कथित जमीन घोटाळ्यासंबंधित मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात ईडीकडून तपास केला जात आहे.
नवव्यांदा हेमंत सोरेन ईडीसमोर चौकशीसाठी आले नाहीत. यामुळे ईडीचे पथक निवासस्थानी दाखल होण्याआधीच हेमंत सोरेन अज्ञात स्थळी निघून गेले आहेत. सकाळपासून ईडीचे पथक मुख्यमंत्र्यांचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अद्याप हेमंत सोरेन यांच्याबद्दल काहीही कळलेले नाही.
सकाळी सात वाजताच ईडीचे पथक दाखल
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी ईडीचे पथक सोमवारी सकाळीच सात वाजता पोहोचले. पण हेमंत सोरेन घरी नव्हते. मुख्यमंत्र्यांबद्दल सांगण्यात आले की, काल (28 जानेवारी) रात्रीपासूनच अज्ञात स्थळी निघून गेले असून परतले नाहीत. यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली. ईडीने म्हटले की, हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घराची तपासणी जमीन घोटाळ्यासंबंधित मिळालेल्या ताज्या इनपुटच्या आधारावर करण्यात आली होती.
हेमंत सोरेन यांना 29 किंवा 31 जानेवारीला ईडीच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी हेमंत सोरेन आले नाहीत तर थेट ईडीकडून त्यांना संपर्क केला जाईल. दरम्यान, सोरेन यांनी 31 जानेवारीला ईडी चौकशीसाठी उपस्थितीत राहणार असल्याचे म्हटले होते.
आणखी वाचा :