नवी दिल्ली [भारत], २५ फेब्रुवारी (ANI): राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात मंगळवारी पहाटे ५.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
NCS नुसार, हा भूकंप सकाळी ६:१० वाजता ९१ किलोमीटर खोलीवर झाला. "भूकंपाची तीव्रता: ५.१, दिनांक: २५/०२/२०२५ ०६:१०:२५ IST, अक्षांश: १९.५२ N, रेखांश: ८८.५५ E, खोली: ९१ किमी, स्थान: बंगालचा उपसागर," असे NCS ने X वर म्हटले आहे.
या भूकंपाचा धक्का बंगाल सोबतच बंगळूर शहराला बसला आहे. अचानक झालेल्या भूकंपामुळे येथील नागरिक घाबरून गेले आहेत. सर्वांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या असून कोणीही घाबरून जाऊ नये असेही सांगण्यात आलं आहे.