मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे 7 दिवसांचा राजकीय शोक, शासकीय कार्यक्रमही रद्द

Published : Dec 27, 2024, 07:43 AM IST
Manmohan Singh Death

सार

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी (27 डिसेंबर) आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

Dr Manmohan Singh’s death :  देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात गुरुवारी रात्री निधन झाले. याच कारणास्तव केंद्र सरकारकडून सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय सरकारकडून पुढील 7 दिवसांसाठी राजकीय शोक व्यक्त केला आहे. सूत्रांनुसार, शुक्रवारी सकाळी 11 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार संपूर्ण राजकीय इतमामात केले जाणार आहेत.

दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह गुरुवारी बेशुद्ध पडले असता त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले. तेथेच सिंह यांचे निधन झाले. मनमोहन सिंह दीर्घकाळापासून आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत होते. याआधीही अनेकवेळा मनमोहन सिंह यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

काँग्रेसकडून सर्व कार्यक्रम रद्द

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेसनेही आपले सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द केले आहेत. काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी म्हटले की, मनमोहन सिंह यांच्या सन्मानार्थ स्थापना दिवसाच्या समारंभासह पक्षाचे अन्य कार्यक्रम पुढील सात दिवसांसाठी अधिकृतपणे रद्द केले आहेत. पक्षाचे पुन्हा कामकाज 3 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. शोकच्या काळात पक्षाचा झेंडा अर्धवट झुकलेल्या स्थितीत असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे.

 

 

मी माझ्या गुरुंना गमावले- राहुल गांधी

काँग्रेसचे मादी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मनमोहन सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये म्हटले की, मनमोहन सिंह यांनी बुद्धीमत्ता आणि निष्ठेसह भारताचे नेतृत्व केले होता. त्यांची विनम्रता आणि अर्थशास्राच्या सखोल विचाराने देशाला प्रेरित केले. श्रीमती कौर आणि परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावला आहे. अशा आशयाची पोस्ट राहुल गांधी यांनी लिहिली आहे.

 

आणखी वाचा : 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनमोहन सिंग यांच्या निधनावर PM मोदींचा शोक, म्हणाले- आर्थिक धोरणावर त्यांची छाप

PREV

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!