नवी दिल्ली - दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना Z श्रेणीची सुरक्षा आहे. ही भारतातली VIP आणि VVIP साठी असलेल्या पाच प्रकारच्या सुरक्षापैकी तिसरी मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. तरीही त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्या कानशिलात लगावण्यात आली.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण राजधानीत खळबळ उडाली आहे. एवढ्या कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही आरोपी मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचला आणि हल्ला कसा करू शकला, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ही घटना बुधवारी सकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी आयोजित जनसुनवाईदरम्यान घडली. नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत आरोपीने अचानक हल्ला चढवला. घटनेनंतर दिल्लीचे मुख्य सचिव, अनेक पोलीस अधिकारी तसेच मंत्री आणि आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
26
CM च्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर मुख्यमंत्री गुप्ता यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढ्या घट्ट सुरक्षा कवचातही हल्लेखोर आत कसा शिरला, याची तपासणी आता सुरू झाली आहे.
36
रेखा गुप्तांना Z श्रेणीची सुरक्षा
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जेड श्रेणीची सुरक्षा दिली गेली आहे. परिस्थितीनुसार मंत्रालय ही सुरक्षा वाढवू किंवा कमी करू शकते. गरज भासल्यास त्यांना जेड प्लस (Z+) सुरक्षा देण्याचीही तरतूद आहे.
मुख्यमंत्रींच्या सुरक्षेसाठी एकूण २२ जवानांची फौज तैनात असते. यात कमांडो, शस्त्रांनी सज्ज ८ पोलीस जवान, पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर (PSO), एस्कॉर्ट्स आणि वॉचर्स यांचा समावेश असतो.
56
किती प्रकारची असते सुरक्षा?
भारतात एकूण पाच प्रकारच्या सुरक्षा श्रेणी असतात, Z+ (सर्वोच्च), Z, Y+, Y आणि X. जेड श्रेणी ही तिसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची सुरक्षा मानली जाते. यामध्ये नियुक्त एनएसजी (National Security Guard) कमांडो क्षणार्धात कोणत्याही धोक्याचा मुकाबला करण्यास सक्षम असतात. सध्या गृहमंत्री अमित शाह आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना अशा प्रकारची सुरक्षा आहे.
66
गुजरातचा आहे हल्लेखोर
माध्यमांतील वृत्तांनुसार, मुख्यमंत्री गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजेशभाई खीमजी (वय ४१) असे असून तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आहे.