
हैदराबाद येथील जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (JNTU) मंजीरा बॉईज हॉस्टेलमध्ये गुरुवारी, २९ ऑक्टोबरच्या रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला. रात्रीच्या जेवणासाठी बनवलेल्या छोले मसाल्याच्या मोठ्या पातेल्यात एक पाल सापडली. विद्यार्थ्यांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामुळे अन्नाच्या दर्जावर आणि स्वच्छतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी हॉस्टेल प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली, अशी माहिती तेलंगणा टुडेने दिली आहे.
జేఎన్టీయూలోని మంజీరా హాస్టల్ కూరలో బల్లి
గత రాత్రి భోజనంలో కూరలో బల్లిని గుర్తించిన విద్యార్థులు
ఘటనను వీడియో తీసిన విద్యార్థులు
నాణ్యమైన భోజనం అందించాలని డిమాండ్ చేసిన విద్యార్థులు
#Hyderabad #JNTU https://t.co/FLrQVKyH7Q
— citizenspulse (@citizenspulse01) October 30, 2026
#Hyderabad
Lizard spotted in food at #JNTUH Campus!
Lizard found in Choley Curry prepared Thursday night at #Manjeera Boys Hostel, JNTUH Campus, creating panic among students.
At the time of the incident, only Caretaker was present. #Hostel Warden and Deputy Warden were not available at the hostel office.
Students allege that Wardens and Deputy #Wardens should stay in hostels, but they are not staying in hostels, raising serious questions over #food safety and hostel supervision.
#JNTUH #Hyderabad #Telangana
— NewsMeter (@NewsMeter_In) October 30, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्टेलच्या मेसमध्ये भाजीच्या पातेल्यात पाल दिसताच विद्यार्थ्यांचे डोके भडकले. ही पाल दिसण्यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी तेच जेवण खाल्ले होते, ज्यामुळे विषबाधा होण्याची भीती निर्माण झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मेसमधील अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला.
दुसरीकडे, विद्यापीठ प्रशासनाने मात्र यावर वेगळाच दावा केला आहे. JNTU चे जनसंपर्क अधिकारी (PRO) श्रावण जी यांनी Siasat.com शी बोलताना सांगितले की, मेसची वेळ रात्री ७.३० ते ९ वाजेपर्यंत असते. हा व्हिडिओ जेवण संपल्यानंतर आणि भांडी धुण्याच्या जागेवर नेल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी शूट केला आहे.
या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी हॉस्टेल परिसरात एकत्र येत मोठा मोर्चा काढला. मेसमधील अस्वच्छता आणि अन्नाचा घसरलेला दर्जा यावर विद्यार्थ्यांनी प्रशासनाला जाब विचारला. जेवणाच्या दर्जाबाबत आम्ही आधीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या, पण प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
रूम भाडे आणि मेसचे पैसे आम्ही वेळेवर भरतो, मग आम्हाला सुरक्षित आणि स्वच्छ जेवण का मिळत नाही? असा थेट सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. निष्काळजीपणा करणाऱ्या मेस कंत्राटदारावर आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच रोजच्या जेवणाची पाहणी व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे हॉस्टेलमधील अस्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वीही विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये उंदीर, कुत्रे आणि मांजरांच्या वावराबाबत तक्रारी केल्या होत्या. हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये आणि कॉरिडोअरमध्ये भटकी जनावरे फिरत असल्याचे व्हिडिओ आधीही समोर आले होते. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होऊन जेवणाची स्वच्छता आणि सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.