मुघलकालीन मशिदीच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणादरम्यान झालेल्या अशांततेचे मूल्यांकन करण्यासाठी राहुल गांधी इतर पाच खासदारांसह संभलला भेट देणार आहेत. या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता.
नवी दिल्ली: मुघलकालीन मशिदीच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय)च्या परीक्षणा दरम्यान २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी पक्षाच्या इतर पाच खासदारांसह बुधवारी उत्तर प्रदेशातील संभलला भेट देणार आहेत.
उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय राय यांनी सांगितले की, जिथे अशांततेदरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला त्याठिकाणी वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा देखील राहुल गांधी यांच्यासोबत संभलला भेट देऊ शकतात.
काँग्रेस नेते सचिन चौधरी एएनआयशी बोलताना म्हणाले की,"पोलिस आम्हाला संभलला जाण्यापासून थांबवत आहेत. यापूर्वी त्यांनी आम्हाला २ डिसेंबरची वेळ दिली होती. मला एवढेच विचारायचे आहे की, आम्ही पीडितांचे हित विचारू शकत नसू तर ही लाजिरवाणी गोष्ट नाही का? आम्ही दुपारी १ वाजता संभलकडे निघू आणि २ वाजेपर्यंत तिथे पोहचू. सकाळपासून माझ्या निवासस्थानी पोलीस आहेत." असे त्यांनी सांगितले.
याआधी गेल्या आठवड्यात बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी मुरादाबाद विभागाचे विभागीय आयुक्त औंजनेय कुमार सिंह यांनी सांगितले की संभल हिंसाचारप्रकरणी २७ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ७ एफआयआर नोंदवले आहेत, त्यापैकी ४ मृतांच्या कुटुंबियांनी नोंदवले आहेत. एकूण २७ जणांना अटक करण्यात आली आहे, यापैकी ३ महिला आणि ३ अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांना बालसुधारणागृहात पाठवण्यात आले आहे. कॅमेऱ्याच्या मदतीने ७४ जणांची ओळख पटवली आहे.”
याआधी सोमवारी, यूपी पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना नोटीस बजावली आणि हिंसाचारग्रस्त संभलला भेट न देण्याचा सल्ला दिला.
हा तणाव जामा मशिदीच्या न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षणातून उद्भवला होता. ही मशीद हे मूळ मंदिर असल्याचा दावा करणारे ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन यांच्या याचिकेनंतर हा तणाव सुरू झाला होता. १९ नोव्हेंबरपासून संभलमधील परिस्थिती अस्थिर आहे,आंदोलक आणि पोलिसांमधील हिंसक चकमकीत किमान पाच ठार झाले आणि २० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक जखमी झाले.
हेही वाचा-
बांगलादेशी नागरिकांना खोल्या नाकारण्याचा हॉटेल मालकांचा निर्णय