उत्तराखंडच्या उत्तरकशी जिल्ह्यात तुफान पाऊस झाला असून एक संपूर्ण गावचं वाहून गेल्याच दिसून आलं आहे. हर्षील भागातील खीर गंगा नदीजवळ ढगफुटीसारखा पाऊस झाला असून खीर गंगा हे संपूर्ण गावचं यामध्ये बुडून गेलं आहे. उंच डोंगरातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत येत असून मातीचा चिखल वाहून गेल्याच व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे.
अनेक इमारती या पुरामध्ये जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक जण चिखलाखाली गाडले असून आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहून या दुर्घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
गंगोत्रीला जात असताना धराली हा महत्वाचा टप्पा असून येथे एक महत्वाचा थांबा आहे. धराली येथून एक खीर गंगा नदी वाहत असून ही नदी डोंगरातून खाली वाहत असते. या नदीच्या पात्रात ढगफुटीमुळे प्रचंड पाण्याचा प्रवाह वाहू लागला आहे. या पाण्याच्या प्रवाहासोबत मातीचा ढीग वाहून आला आहे. अचानक आलेल्या या महापुरामुळे विनाशकारी दृश्य पाहायला मिळालं आहे.
या महापुरात अनेक हॉटेल्स बेचिराख झाल्याचं दिसून आलं आहे. गावातील घरे, होमस्टे पूर्णपणे महापुरात बेचिराख झाली असून त्यामधील लोकांचा तपास लागतं नाही. केवळ ३० सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांचा जीव भीतीने कावराबावरा झाला आहे. जिल्हा प्रशासनाचे यावेळी लोक घटनास्थळी पोहचले आहेत.