दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांचा फोन फॉरमॅट झाला असून तो आता एक्सपर्टकडे पाठवण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळेसच व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये मुख्यमंत्री निवासस्थानातील मिळत नाही.
स्वाती मालिवाल केसमध्ये रोज नव नव्या घटना समोर येताना आपल्याला दिसून येत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप स्वाती यांनी केला आहे. मुख्यमंत्री निवासस्थानातील काही व्हिडीओ व्हायरल झाले असून यामध्ये स्वाती मालिवाल या स्पष्टपणे दिसून येत आहेत. बिभव कुमार यांचा फोन फॉरमॅट करण्यात आला असून तो आता तज्ज्ञांकडे डिलीट झालेली माहिती मिळवण्यासाठी देण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री निवास स्थानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी छेडछाड करण्यात आली असून यामधील व्हिडीओ दिसत नसल्याचे समोर आले आहे.
बिभव कुमार यांनी फोन केला होता फॉरमॅट -
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांचा फोन फॉरमॅट करण्यात आला आहे. ते फोनचा पासवर्ड सांगत नसल्यामुळे फोनमधील माहिती रिकव्हर करण्यासाठी तज्ज्ञांकडे पाठवण्यात आला आहे. मुख्यमंत्री निवासस्थानातून अजूनही सीसीटीव्ही डीव्हीआर देण्यात आला नाही. त्यामध्ये सर्व व्हिडीओ रेकॉर्ड देण्यात आलेले असतात. त्यामुळे सर्व माहिती मिळवण्यास अडचण येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सीसीटीव्हीमध्ये करण्यात आली छेडछाड -
सीसीटीव्हीमध्ये छेडछाड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांना मिळालेल्या पेनड्राइव्हमध्ये काहीच नसल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटीव्हीमध्ये कोरे असल्याचे दिसून आले आहे. सीसीटीव्हीशी छेडछाड करून सीएम हाऊसमधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
बिभव कुमार यांना न्यायालयीन कोठडी -
बिभव कुमार यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते पण तो त्यांना मिळू शकला नाही. नंतर त्यांना पोलिसांनी अटक केले आणि न्यायालयासमोर हजर केल्यावर पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बिभव यांनी मोबाईलचा पासवर्ड न सांगितल्यामुळे तो तज्ञ व्यक्तींकडे तपासणीसाठी देण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमऱ्याचे फुटेज मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
आणखी वाचा -
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक पती पत्नीवर झाडल्या गोळ्या, शोपियानमध्ये भाजप नेत्याची हत्या
उद्या माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना आव्हान