निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांकडून हेलिकॉप्टर आणि प्रायव्हेट जेटच्या मागणीत वाढ, एका तासाठीचे भाडे ऐकून व्हाल हैराण

Published : Mar 11, 2024, 02:00 PM ISTUpdated : Mar 11, 2024, 02:09 PM IST
Helicopter

सार

आगामी लोकसभा निवडणुका लवकरच देशात होणार आहेत. अशातच प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टरची मागणी 40 टक्क्यांनी अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Lok Sabha Election :  लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. याशिवाय राजकीय हालचालीही वेगाने होत आहेत. राजकीय नेतेमंडळी देशभरात ठिकठिकाणी जनसभेला संबोधित करत आहेत. अशातच खासगी विमान आणि हेलिकॉप्टरची मागणी वेगाने वाढत आहे. भाड्याने प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टर देणाऱ्या इंडस्ट्रीला अशी अपेक्षा आहे की, यंदाच्या निवडणुकीत आधीच्या निवडणुकीपेक्षा 40 टक्क्यांपर्यंत प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टरची मागणी वाढू शकते.

निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांकडून हेलिकॉप्टरची मागणी वाढली जाते. यामुळे दूरवर असलेल्या एखाद्या ठिकाणी काही वेळात पोहोचणे शक्य होते. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्रायव्हेट जेटची गरज भासते. जेणेकरुन एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी फार कमी वेळ लागतो.

प्रायव्हेट जेटच्या मागणीत वाढ
भाडेतत्त्वार आलिशान जेट देणारी कंपनी क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी म्हटले की, विमानांची वेगाने मागणी वाढत आहे. लवकरच मागणीत वाढ होऊ शकते. भाड्याने दिल्या जाणारे विमाने आणि हेलिकॉप्टरची संख्या मर्यादित आहे. अशातच मागणी वाढल्यास कंपन्यांना लीजवर अधिक विमान आणि हेलिकॉप्टर घ्यावे लागतील.

विमान आणि हेलिकॉप्टरचे भाडे
विमान आणि हेलिकॉप्टरचे भाडे प्रति तासावर अवलंबून असते. विमानाचे भाडे 4.5 लाख रुपये ते 5.25 लाख रुपये प्रति एक तास असू शकते. याशिवाय विमान किती मोठे आणि आलिशान आहे यावरुनही भाडे ठरले जाते.

दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टरचे भाडे दीड लाख रुपयांच्या आसपास असते. एक इंजिन असणाऱ्या हेलिकॉप्टरचे भाडे दोन इंजिनच्या हेलिकॉप्टरपेक्षा कमी असते. आकाराने मोठ्या असणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी अधिक भाडे मोजावे लागते. बिझनेस एअरक्राफ्ट ऑपरेटर्स असोसिएशनला (BAOA) अपेक्षा आहे की, लोकसभा निवडणुकीदरम्यान आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत 30-40 टक्क्यांनी अधिक मागणी वाढली जाऊ शकते.

निवडणुकीसारख्या मोठ्या स्तरावरील कार्यक्रमांवेळी हेलिकॉप्टर आणि विमानांची मागणी वाढली जाते. अशातच कंपन्या मागणी पूर्ण करण्यासाठी हेलिकॉप्टर आणि विमाने लीजवर घेतात. या कंपन्यांना NSOPs (Non-Scheduled Operators) असे म्हटले जाते. डिसेंबर, 2023 पर्यंत या कंपन्यांची संख्या 112 होती. एका अनुमानानुसार, या कंपनीकडे 450 विमाने आणि हेलिकॉप्टर्स आहेत.

भाजप आणि काँग्रेसकडून विमानांवर केला जातो अधिक खर्च
कोरोनाच्या परिस्थितीनंतर चार्डेट विमानांचे भाडे 4.5 लाख ते 5.25 लाख रुपये प्रति तास आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप आणि काँग्रेसकडून चार्टेड विमानांवर अधिक पैसा खर्च केला जातो. याच्या माध्यमातून राष्ट्रीय नेत्यांना राज्यांतील प्रचारासाठी पाठवले जाते.

आणखी वाचा : 

SBI ने इलेक्टोरल बाँड प्रकरणात तपशील देण्यासाठी आणखी वेळ मागितला, सुप्रीम कोर्टाने लिफाफा उघडून डेटा देण्याचे दिले आदेश

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील नेत्यांनी केला भाजपत प्रवेश, एका दिवसात राजस्थानमध्ये 1300 नेत्यांनी पक्ष सोडला

स्मृती इराणींनी 225 कोटींच्या प्रकल्पाची केली पायाभरणी, ‘या’ राज्यांना मिळणार बौद्ध विकास योजनेचा लाभ

PREV

Recommended Stories

Lionel Messi India Visit : 14 वर्षांनंतर लिओनेल मेस्सी भारतात दाखल, ‘GOAT इंडिया टूर 2025’ला भव्य सुरुवात
मेस्सी-मेस्सीच्या घोषणांनी दुमदुमले कोलकाता, रात्री उशिरा पोहोचला GOAT