चार धाम मंदिराच्या परिसरात व्हिडीओ आणि रिल्स शूट करण्यावर बंदी, 31 मार्चपर्यंत VIP दर्शनही नाही

उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतूडी यांनी चार धाम मंदिराच्या परिसरात व्हिडीओ किंवा रिल्स बनवण्यावर बंदी घातली आहे. चार धाम यात्रेसाठी होणारी भाविकांची गर्दी पाहता मुख्य सचिवांनी व्हिआयपी दर्शनही बंद केले आहे.

Char Dham Yatra 2024 :  उत्तराखंड सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत चार धाम मंदिराच्या परिसरात 50 मीटरच्या अंतर्गत सोशल मीडियासाठी तयार केले जाणारे व्हिडीओ किंवा रिल्सवर बंदी घातली आहे. उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतूडी यांनी गुरुवारी एक आदेश जारी भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

उत्तराखंड मुख्य सचिवांकडून भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना
व्हिडीओ आणि रिल्स तयार करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय अशावेळी घेण्यात आलाय ज्यावेळी स्थानिक नागरिक आणि काही पुजाऱ्यांनी म्हटले की, पारंपारिक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यासंबंधित राधा रतूडी यांनी सांस्कृतिक आणि धार्मिक प्रकरणातील सचिवांना पत्र लिहित यासंबंधित योग्य कार्यवाही करण्याचा आग्रह केला आहे.

व्हिआयपी दर्शनावर 31 मे पर्यंत बंदी
चार धाम यात्रेसाठी भाविकांची होणारी गर्दी पाहता उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतूडी यांनी व्हिआयपी दर्शनावर 31 मे पर्यंत बंदी घातली आहे. जेणेकरुन सर्व सामान्य भाविकांना चार धामचे दर्शन करता येईल. यादरम्यान, केवळ नोंदणीकृत भाविकांनाच दर्शनासाठी परवानगी मिळणार आहे. याशिवाय भाविकांची चेक पोस्ट येथे कठोर तपासणीही केली जाणार आहे. जे भाविक नोंदणी करुन येणार नाहीत त्यांना यात्रेसाठी पुढे पाठवले जाणार नाही.

मुख्यमंत्री धामींचे अधिकाऱ्यांना निर्देश
गुरुवारी झालेल्या एका आढावा बैठकीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घोषणा करत म्हटले की, यात्रेसाठी ऑफलाइन रजिस्ट्रेशन तीन दिवस बंद ठेवले जाईल. याशिवाय राज्यातील अधिकारी आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. भाविकांची होणारी गर्दी पाहता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तेथील स्थितीचा आढावा घेण्यासही पोलिसांना सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

Swati Maliwal Case : स्वाती मालिवाल यांच्यावर रात्री उशिरापर्यंत वैद्यकीच चाचणी, वाचा प्रकरणातील आतापर्यंतची टाइमलाइन

हुबळीत नेहा हिरेमठसारखी आणखी एक हत्या, घरात घुसून तरुणीवर चाकू हल्ला, नक्की कारण काय?

Share this article