8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ४४,२८० रुपयांपर्यंत होणार का वाढ?

Published : Jul 21, 2025, 09:36 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ८ वा वेतन आयोग पगार आणि पेन्शनमध्ये चांगलीच वाढ देऊ शकतो. अॅम्बिट कॅपिटलच्या रिपोर्टनुसार, पगार ३०-३४% पर्यंत वाढू शकतात, जे २०२६ किंवा २०२७ या आर्थिक वर्षात लागू होऊ शकतात. जाणून घ्या वाढ…

PREV
110
८ वा वेतन आयोग

केंद्रीय कर्मचारी ८व्या वेतन आयोगाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण त्यांच्या पगारात घसघशीत वाढ झालेली दिसून येईल. त्यांना प्रलंबित रक्कम मिळाली तर एक मोठी रक्कम त्यांच्या हातात पडेल. त्यानंतर हा वेतन आयोग्य राज्य सरकारही लागू करेल. त्यामुळे राज्य सरकरी कर्मचारीही याची वाट बघत आहेत.

210
पगार ३०-३४% वाढू शकतो

नवीन वेतन रचनेमुळे एकूण पगार ३०-३४% वाढू शकतो. पगारात एवढी मोठी एकरकमी वाढ मिळाली तर त्यांना मोठा आर्थिक लाभ झालेला दिसून येईल. त्यांची खरेदी शक्ती वाढलेली असेल. त्यांना मोठे आर्थिक निर्णय घेता येतील.

310
२०२६ किंवा २०२७ महत्त्वाचे

हे बदल २०२६ किंवा २०२७ मध्ये लागू होऊ शकतात. त्यामुळे या पगारवाढीची आतुरतेने वाट बघितली जात आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी संबंधित व्यवसायही याची वाट बघत आहेत. कारण याचा लाभ त्यांनाही होणार आहे. त्यांची विक्री वाढलेली दिसून येईल.

410
सध्या ६ व्या वेतन आयोगानुसार पगार

सध्याचे वेतन २०१६ च्या ७व्या वेतन आयोगावर आधारित आहे. पण बाजारपेठेचा विचार केला तर सध्याही ही वाढ प्रचंड आहे. त्यामुळे काही वर्षांचा अनुभव असलेला केंद्रीय आणि राज्य सरकारचा कर्मचारी साधारणपणे ७० ते ९० हजार रुपये घरी नेत आहे.

510
दहा वर्षांनी वेतन दुरुस्ती

दर दहा वर्षांनी वेतन रचना दुरुस्त केली जाते. याचा नियम करण्यात आला आहे. प्रत्येक १० वर्षांनी सरकारी कर्मचार्यांना ही वाढ दिली जाते. ती कधी लागू केली जाते तेही महत्त्वाचे असते. कारण आधी लागू केली असेल तर प्रलंबित रक्कम कर्मचार्यांना द्यावी लागते.

610
मोठी वाढ मिळेल

८वा वेतन आयोग ही परंपरा कायम ठेवेल असे दिसून येत आहे. सध्या या वेतन आयोगाची मोठी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. 

710
फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा

फिटमेंट फॅक्टर म्हणजे नवीन मूळ वेतन निश्चित करण्याचा गुणक आहे. त्यातून मूळ वेतन निश्चित केले जाते. या वेतन आयोगात याचीही भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

810
किमान वेतन वाढ ३२,९४०

किमान वेतन वाढ ३२,९४० किंवा ४४,२८० रुपये होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या पगारात कर्मचार्यांना मोठी वाढ मिळेल. 

910
मोठी तफावत

५०,००० चे वेतन ९१,५०० ते १.२३ लाख होऊ शकते. म्हणजेच जवळपास दुपटीने वेतन वाढ होण्याची शक्यता आहे. याचा फायदा शासकीय कर्मचार्यांना होताना दिसून येईल.

1010
महागाईनुसार पेन्शन

महागाईनुसार पेन्शनची रक्कम अपडेट होईल. त्यामुळे पेन्शनधारकही याची वाट बघत आहे. त्यांनाही याचा आर्थिक लाभ होताना दिसून येईल.

Read more Photos on

Recommended Stories