नवी दिल्ली : डिजिटल इंडिया कार्यक्रमाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने एक बंपर ऑफर जाहीर केली आहे. या निमित्त 'रील स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. रील्स बनवणाऱ्यांना पैशांच्या स्वरुपात बक्षिसे दिली जाणार आहेत. जाणून घ्या..
डिजिटल इंडिया १० वर्षांचा उत्सव.. रील स्पर्धा सुरू
डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या १० वर्षांच्या निमित्ताने रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरुण आणि कंटेंट क्रिएटर्सना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी सरकारकडून देण्यात आली आहे.
26
डिजिटल इंडिया रील स्पर्धेत कसे सहभागी व्हावे?
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १ मिनिटाचा रील तयार करावा लागेल. तो कोणत्याही डिजिटस विषयांवर तयार करता येईल. त्याची गुणवत्ता चांगली असायला हवी. त्यानंतर तयार केलेला रील https://innovateindia.mygov.in वर अपलोड करावा लागेल.
36
डिजिटल इंडिया रील स्पर्धा: कोणत्या विषयांवर रील बनवायचा?
डिजिटल इंडिया, BHIM UPI, UMANG, DigiLocker, eHospital, डिजिटल शिक्षण, आरोग्य, प्रशासन, डिजिटल पेमेंट यावर रील बनवावा लागेल. त्यातून समाजिक संदेत देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डिजिटल इंडिया रील स्पर्धा: विजेत्यांना किती बक्षीस मिळेल?
टॉप १० विजेत्यांना ₹१५,०००, पुढील २५ जणांना ₹१०,००० आणि ५० जणांना ₹५,००० असे बक्षिसे दिली जातील. त्यामुळे पैशांच्या स्वरुपात बक्षिसे मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
डिजिटल इंडिया रील स्पर्धेची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२५ आहे. व्हिडिओ १ ऑगस्टपर्यंत अपलोड करावा लागेल. त्यापूर्वी रील्स तयार करुन तो एडिट करुन नीट दिसेल असा करावा. त्यानंतरच तो अपलोड करावा. रफ रील अपलोड करु नका.
66
ग्रामीण स्वच्छतेवरही रील स्पर्धा
ग्रामीण स्वच्छतेवर ९० ते १५० सेकंदांचा व्हिडिओ बनवून https://www.mygov.in/ वर ३१ जुलैपर्यंत अपलोड करा. टॉप ५ व्हिडिओंना ₹५,००० बक्षीस दिले जाणार आहे. याच्या माध्यमातून ग्रामीण स्वच्छतेचा प्रचार, प्रसार केला जाणार आहे.