DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! नव्या वर्षात पगारात मोठी वाढ; 8 व्या वेतन आयोगापूर्वीच मिळणार 'हे' गिफ्ट

Published : Jan 07, 2026, 03:59 PM IST

DA Hike : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना १ जानेवारी २०२६ पासून महागाई भत्त्यात (DA) वाढ मिळणे निश्चित झाले आहे. AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, DA २% ने वाढून ६०% होण्याची शक्यता आहे.

PREV
15
सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! नव्या वर्षात पगारात मोठी वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी २०२६ या वर्षाची सुरुवात गोड बातमीने होणार आहे. महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये वाढ होण्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून, १ जानेवारी २०२६ पासून सरकारी तिजोरीतून कर्मचाऱ्यांच्या खिशात जास्तीचे पैसे येणार आहेत. यामुळे वाढत्या महागाईशी लढणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

25
महागाई भत्ता आता ६० टक्क्यांवर!

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना ५८% दराने महागाई भत्ता मिळत आहे. ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्सच्या (AICPI) ताज्या आकडेवारीनुसार, ही वाढ २ टक्क्यांची असणे जवळपास निश्चित आहे. 

35
काय सांगते आकडेवारी?

नोव्हेंबर २०२५ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक १४८.२ वर पोहोचला आहे. यानुसार मोजणी केल्यास महागाई भत्ता ५९.९३ टक्क्यांवर जातो.

डिसेंबरचा अंदाज: जरी डिसेंबर महिन्याचा निर्देशांक स्थिर राहिला, तरी सरासरी ६० टक्क्यांच्या पुढेच जाते. सरकारी नियमांनुसार अपूर्णांक ग्राह्य न धरता पूर्ण संख्येत वाढ दिली जाते, त्यामुळे ६०% DA मिळणे निश्चित मानले जात आहे. 

45
८ व्या वेतन आयोगाच्या उंबरठ्यावर मोठे गिफ्ट

१ जानेवारी २०२६ पासून ८ व्या वेतन आयोगाचे (8th Pay Commission) नवीन चक्र सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वीच होणारी ही महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांसाठी दुहेरी आनंद देणारी ठरणार आहे. 

55
पगार वाढ कधी मिळणार?

अंमलबजावणी: वाढीव दर १ जानेवारी २०२६ पासूनच लागू होतील.

घोषणा कधी: सरकारी प्रक्रियेनुसार, याची अधिकृत घोषणा मार्च किंवा एप्रिल २०२६ मध्ये होणे अपेक्षित आहे.

थकबाकी (Arrears): घोषणा उशिरा झाली तरी कर्मचाऱ्यांना जानेवारीपासूनची वाढीव रक्कम 'एरिअर्स'च्या स्वरूपात एकत्रित दिली जाईल. 

दैनंदिन खर्च, घरभाडे आणि आरोग्यसेवेचा वाढता खर्च पाहता, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ५० लाखांहून अधिक कर्मचारी आणि ६५ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories