Satyapal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापा टाकला आहे. किरु जलविद्युत प्रकरणातील भ्रष्टाचार प्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे.
Satyapal Malik : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरासह 30 पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार किरु जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटात भ्रष्टाचाराच्या चौकशीचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात आला.
किरू जलविद्युत प्रकल्प प्रकरणामुळे जम्मू-काश्मीर, बिहार, गोव्यासह मेघालयचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. किरू हा हायड्रो इलेक्ट्रिकचा प्रकल्प आहे, तो किश्तवाडमधील चिनाब नदीवर 2019 प्रस्तावित होता. त्या वेळी 2,200 कोटी रुपयांचे सिव्हील कामाचे कंत्राट देण्यात आले.
'आज तक' या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, सत्यपाल मलिक यांच्यावर आरोप आहेत की, ते 2019 मध्ये जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टशी संबंधित फाइल मंजूर करण्यासाठी 3,00 कोटी रुपयांची लाच देण्यात आली. त्यावेळी जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश नव्हता. याचा अर्थ कलम 370 हटवण्यापूर्वी 5 ऑगस्ट 2019मध्ये ही घटना घडली.
सत्यपाल मलिक हे 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. मागील महिन्यात सीबीआयने किरू जलविद्युत प्रकल्पाप्रकरणी दिल्लीसह जम्मू-काश्मीरमध्ये 8 ठिकाणी छापे टाकले होते.
आणखी वाचा :
Lok Sabha Election 2024 : BJPच्या 'फिर एक बार, मोदी सरकार' प्रचार गीतामध्ये 24 भाषांचा समावेश WATCH VIDEO
कर्नाटकातील मंदिरांकडून वसूल केला जाणार 10 टक्के टॅक्स, काँग्रेस सरकारच्या निर्णयानंतर BJP ने दिली संतप्त प्रतिक्रिया
नोए़डामध्ये आंदोलन करणाऱ्या 700 हून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल, राष्ट्रीय ध्वजाच्या अपमानासह पोलिसांवर करण्यात आला जीवघेणा हल्ला