Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प फार महत्त्वाचा असणार आहे. यंदाचा अर्थसंकल्पाचे तुम्हाला कुठे, कधी आणि किती वाजता लाइव्ह प्रक्षेपण पाहायला मिळणार याबद्दल जाणून घ्या सविस्तर....
Union Budget 2024 : 1 फेब्रुवारीला देशाच्या नव्या संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आजपासून (31 जानेवारी) संसदेत अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सरकारने अंतरिम अर्थसंकल्पासाठी पूर्णपणे तयारी केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर होण्याआधी हलवा समारंभ (Halwa Ceremony) देखील पार पडला आहे.
यंदाचा अर्थसंकल्प खास असणार आहे. कारण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. यानंतर नवे सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अशातच जाणून घेऊया अंतरिम अर्थसंकल्प कुठे, कधी आणि किती वाजता पाहायला मिळेल याबद्दल अधिक.....
कधी सादर होणार अर्थसंकल्प 2024?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारीला 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या दिवशी सादर केले जाणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. कारण यंदाच्या वर्षात एप्रिल-मे महिन्यादरम्यान लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) होण्याची शक्यता आहे. अशातच हा अर्थसंकल्प केवळ 'वोट ऑन अकाउंट' प्रमाणे असणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत महसूल आणि खर्चाचे अंदाज सादर केले जातात. जेणेकरून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुरळीत कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये आणि अर्थव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास टिकून रहावा.
किती वाजता सादर केला जाणार अंतरिम अर्थसंकल्प?
अर्थसंकल्प सादर करण्याआधी अधिकृत प्रक्रियेचे पालन केले जाते. यासाठी सर्वप्रथम अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या निवासस्थानाहून नॉर्थ ब्लॉकसाठी रवाना होतील. येथे सर्व अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रपतींची अर्थसंकल्पाबद्दल मंजूरी घेण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अर्थसंकल्पाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतर 11 वाजता संसदेत अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पासंदर्भातील भाषण सुरू होईल.
आजपासून संसदेत अर्थसंकल्पाचे अधिवेशन सुरू होणार
31 जानेवारीपासून संसदेत अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. येत्या 9 फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पाचे अधिवेशन सुरू राहणार आहे. आजच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) दोन्ही लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. यानंतर 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
कुठे पाहू शकता अर्थसंकल्पाचे लाइव्ह प्रक्षेपण
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे लाइव्ह प्रक्षेपण तुम्हाला पाहाता येणार आहे. अर्थसंकल्पाचे लाइव्ह प्रक्षेपण तुम्ही दूरदर्शनव्यतिरिक्त संसदेच्यी टीव्हीवर, PIB च्या सोशल प्लॅटफॉर्म आणि अर्थमंत्रालयाच्या YouTube चॅनलवर पाहू शकता.
आणखी वाचा :
Budget 2024 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष, कृषी क्षेत्रासाठी या घोषणेची शक्यता
Halwa Ceremony : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून हलवा समारंभ संपन्न